Download App

रविंद्र चव्हाण यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी; प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Ravindra Chavan यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यांना पक्ष संघटनेत मोठी संधी देण्यात आलीय.

  • Written By: Last Updated:

Ravindra Chavan Appointed Working State President of Mahrashtra: भाजपने डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan)यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची भाजप (Bjp) महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी चव्हाण यांची या पदावर नियुक्ती केली आहे. मागील मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिलेले रविंद्र चव्हाण यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली नव्हते. परंतु त्यांना पक्ष संघटनेत मोठी संधी देण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे महसूल खाते देण्यात आले आहे. बावनकुळे यांनी अद्याप प्रदेशाध्यक्षपद सोडलेले नाहीत. त्यामुळे चव्हाण यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी रविंद्र चव्हाण हे दावेदार आहेत.

सुकेश चंद्रशेखरचे थेट अर्थमंत्र्यांना पत्र! ७ हजार ६४० कोटींचा कर भरण्याचा दिला प्रस्ताव…

नियुक्तीनंतर रविंद्र चव्हाण यांनी एक ट्वीट केले आहे. राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः”, आपल्या भारतीय जनता पार्टी परिवाराचा हा मंत्र मनात ठेवूनच आजवर राष्ट्रसेवेचा वसा जपत आलो आहे. पक्षाने आजवर ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या, त्यातील प्रत्येक जबाबदारी सर्वतोपरी यशस्वीरित्या पार पाडली. आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी भाजपा कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीच्या बळावर ही जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करेन.

‘संजय राऊत रिकामटेकडे, ते रोज बोलतात, मी रिकामटेकडा नाही…’; CM फडणवीसांची बोचरी टीका

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाहजी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार ! असे चव्हाण यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

follow us