सुकेश चंद्रशेखरचे थेट अर्थमंत्र्यांना पत्र! ७ हजार ६४० कोटींचा कर भरण्याचा दिला प्रस्ताव…

  • Written By: Published:
सुकेश चंद्रशेखरचे थेट अर्थमंत्र्यांना पत्र! ७ हजार ६४० कोटींचा कर भरण्याचा दिला प्रस्ताव…

Sukesh Chandrashekhar : महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सध्या मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. सुकेशवर एक हजाराहून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान, आता त्याने थेट अर्थमंत्री निर्मला सीतारम (Nirmala Sitharaman) यांना पत्र लिहिलं.

कोणी 30 किलोंचे रूद्राक्ष धारण केलेत, तर कोणी 32 वर्षांपासून विनाआंघोळीचं; महाकुंभात विविध प्रकारचे साधू 

सुकेशने अर्थमंत्र्यांना पत्र लिहून २०२४-२०२५ साठी आपले परकीय उत्पन्न जाहीर करण्याची परवानगी मागितली आहे. या पत्रात, सुकेशने त्या कमाईवर भारतीय कर भरण्याची इच्छा व्यक्त केलीये.

२०२४ मध्ये परदेशी कंपन्यांकडून २२१४ कोटींची उलाढाल

सुकेश सध्या 200 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात आहे. जेलमधूनच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना हे पत्र लिहिले आहे. वृत्तानुसार, सुकेशने त्याच्या पत्रात नमूद केलंय की, त्याच्या दोन ऑफशोअर कंपन्या – एलएस होल्डिंग्ज इंटरनॅशनल (नेवाडा, यूएस मध्ये नोंदणीकृत) आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन (ब्रिटिश वर्जिन आयलंड मध्ये नोंदणीकृत) ऑनलाइन आणि ऑफलाइन गेमिंगमध्ये कार्यरत आहे. या कंपन्या २०१६ पासून सट्टेबाजीही करत आहे. या कंपन्यांनी २०२४ मध्ये तब्बल २२१४ कोटी रुपयांची उलाढाल केली. या कंपन्यांचे काम अमेरिका, स्पेन, यूके, दुबई आणि हाँगकाँगपर्यंत विस्तारलेले आहे, असं त्याने नमूत केलं.

७,६४० कोटी रुपयांचा कर भरण्याचा प्रस्ताव

सुकेशने २०२४ मध्ये त्याच्या परदेशातील उत्पन्नावर ७,६४० कोटी रुपये भारतीय कर भरण्याची तयार दर्शवली. यासोबतच, त्याने भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात आणि प्रगत ऑनलाइन कौशल्य गेमिंग व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांना दिला आहे.

दरम्यान, २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करत आहे. ईडीचा हा खटला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) एफआयआरवर आधारित आहे. यामध्ये सुकेशवर रेलिगेअर एंटरप्रायझेसच्या माजी प्रवर्तकांच्या पत्नी अदिती सिंग आणि जपना सिंग यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची नावेही जोडली गेली आहेत.

दरम्यान, आता सुकेशच्या या ऑफरवर भारत सरकार काय भूमिका घेते हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube