Download App

बिहार सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी आधी काडी टाकली; लालूंच्या मुलीने आगीत तेल ओतले

  • Written By: Last Updated:

RJD vs JDU: सध्या तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. त्यांना पुन्हा इंडिया (INDIAA) आघाडीत कसे आणता येईल, याचे प्रयत्न काही नेते करत आहे. परंतु दुसरीकडे इंडिया आघाडीला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही ( Nitish Kumar) इंडिया आघाडीची साथ सोडतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नितीश कुमार हे भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जातील, अशा घडामोडी दिवसभर घडत आहेत. त्यामुळे बिहारमधील आरजेडी (RJD) आणि जेडीयू (JDU) हे सरकार संकटात सापडले आहे. त्यात आरजेडीचे लालू प्रसाद यादव यांची मुलगा रोहिणी आचार्य यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. रोहिणी आचार्य यांनी नितीशकुमारबाबत एक आपत्तीजनक पोस्ट सोशल मीडियावर टाकली. लालू प्रसाद यादव यांनी खडसावल्यानंतर रोहिणी आचार्य ही पोस्ट काढून टाकली आहे.

मराठा समाजाच्या फसवणुकीचं पाप ट्रिपल इंजिन सरकारचं; सर्व्हेच्या व्हिडिओवरुन सुळे संतापल्या…

तोपर्यंत नितीश कुमार यांच्याकडे हे ट्वीट आले होते. त्यांनी या ट्वीटच्या प्रिंट आऊट पुरावे म्हणून काढून ठेवला. यामुळे नितीश कुमारही संतापले. त्यांनी लगेच काही फोन फिरवले आहे. हे फोन दिल्लीतील काही भाजपच्या नेत्यांना केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर मात्र सरकारमध्ये असलेल्या लालू यादव यांच्या कुटुंबात जोरदार गोंधळ उडाला. लालू यादव यांनी लगेच आपल्या मुलाला फोन करून खडसावले. त्यानंतर हे ट्वीट हटविण्यात आले. नितीश कुमार भाजपकडे गेल्यानंतर सरकार संपुष्टात येईल. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी आरजेडीचे (राष्ट्रीय जनता दल) प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांना फोन करून काही सूचना केल्या. नितीश कुमार यांच्याविरोधात कुणी काही बोलू नये, अशा सूचना लालू प्रसाद यादव यांनी दिल्यात.

दिल्लीतील नेत्यांची आंबडेकरांशी चर्चा, ते 30 जानेवारीच्या बैठकीला…; मविआच्या बैठकीनंतर राऊतांचं वक्तव्य

जेडीयू (JDU) चे कार्यालयात कपूरी ठाकूर यांच्या शंभराव्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. त्यांनी केलेले भाषणच वादाचे कारण ठरले. मी कर्पूरी यांच्या विचारधारेवर चालत आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबातील कोणाला राजकारणात पुढे आणले. परंतु काही जण केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करतात. नितीश कुमार यांचे हे भाषण हे लालू प्रसाद, गांधी कुटुंबाविरोधात होते, असा अर्थ काढण्यात आला.

त्याला रोहिणी आचार्य यांनीही सोशल मीडियामधून जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे बिहारचे राजकारणात खळबळ उडाली. त्याचे परिणाम थेट मंत्रिमंडळ बैठकीत दिसून आले. केवळ पंधरा मिनिटात बैठक संपली. त्यानंतर माध्यमांबरोबरही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला नाही. त्यातून नितीश कुमार नाराज असल्याचे स्पष्ट झाले.

रोहिणी आचार्य यांचे तीन ट्वीट
रोहिणी आचार्य यांनी सलग तीन ट्वीट नितीशकुमार यांच्याबाबत केले. स्वतःच्या नियमीमध्ये खोट असेल तर विधीचे विधान कोण टाळेल, समाजवादी असल्याचे काही जण दावा करतात. परंतु हवे प्रमाणे विचारधारा बदलतात. काही लोक आपल्यामधील कमतरता पाहत नाहीत. दुसऱ्यावर चिखलफेक करतात, असे ट्वीट करतात. त्यावरून बिहारचे राजकारण पेटले आहे.

follow us

वेब स्टोरीज