मराठा समाजाच्या फसवणुकीचं पाप ट्रिपल इंजिन सरकारचं; सर्व्हेच्या व्हिडिओवरुन सुळे संतापल्या…

मराठा समाजाच्या फसवणुकीचं पाप ट्रिपल इंजिन सरकारचं; सर्व्हेच्या व्हिडिओवरुन सुळे संतापल्या…

Supriya Sule News : मनोज जरांगेंसह मराठा समाजाची फसवणुकीचं पाप ट्रिपल इंजिन सरकार करत असल्याचा संताप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या सर्व्हेक्षणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये पहिली पास कर्मचाऱ्यावर मराठा सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आल्याचं उघड झालं आहे. त्यावर बोलताना सुळेंनी संताप व्यक्त केला आहे.

IND vs ENG : इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज सचिनलाही भारी; फक्त 29 धावा केल्या अन् बनला नंबर वन

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मराठा आरक्षणाचा मुद्दा आल्यानंतर सरकारने शब्द दिला आहे. त्यामुळे सरकारने सर्वेक्षण तातडीने करायला पाहिजे. मराठा, धनगर आणि लिंगायत समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये. कोणता तरी खोटारडा रिपोर्ट काढून सरकारने कोणत्याही समाजाला फसवू नये. जरांगे पाटलांनी खूप संवेदनशीलपणे सहन केलं आहे. जरांगे यांनी सरकार खूप वेळ दिला आहे. त्यामुळे जरांगे पाटील आणि मराठा समाजाची फसवणूक करण्याचे पाप हे ट्रिपल इंजिन सरकार करीत असल्याचं सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मराठा आरक्षण प्रश्नावर सरकार फक्त तारीख पे तारीख देत आहे. देवेंद्र फडवणीस विरोधी पक्षनेते असताना म्हणाले होते की, एखादी गोष्ट करायची नसल्यावर तारीख पे तारीख आणि कमिटी आणि रिपोर्ट हे त्यांचं वाक्य असल्याची आठवणी सुळेंनी यावेळी करुन दिली आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अदिती राव हैदरीचा स्टायलिश अंदाज

मराठा आरक्षणावरून राज्यात रान पेटलेले असताना अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा समाजाचं मागासलेपण शोधण्यासाठी मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या सर्वक्षणासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांना देखील नियुक्त करण्यात आले आहे. मात्र या सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कर्मचारी हे अशिक्षित, अप्रशिक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात तर एक पहिली पास व्यक्ती या सर्वेक्षण करत असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे नगरमध्ये मराठा सर्वेक्षणाचा फज्जा उडाला असल्याचे समोर आले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय?
अहमदनगर महानगरपालिकेकडून सर्वेक्षणासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. असाच एका कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा कर्मचारी म्हणतो की मी सर्वेक्षणासाठी आलो आहे. माझं ट्रेनिंग झालं आहे मात्र माझं शिक्षण झालं नसल्याने मला यामधील काही माहिती नाही. या कामासाठी मी एक जोडीदार सोबत घेतला आहे त्याच्या मदतीने मी हे सर्वक्षणाचे काम करतो आहे असं हा कर्मचारी सांगतो आहे. मी पालिकेत इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून कार्यरत आहे. मात्र माझी शिक्षण पात्रता नसल्याने मला या कामाचा काही अनुभव नाही असे कर्मचारी काबुल करतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube