Download App

कुरबुरी सुरूच! माझा फोटो वापरू नका, अन्यथा…; संजय खोडकेंचा नवनीत राणांना सज्जड दम

  • Written By: Last Updated:

Sanjay Khodke on Navneet Rana : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीला महायुतीतील (Mahayuti) अनेक नेत्यांनी विरोध केला होता. मात्र, भाजपने राणांना उमेदवारी दिली. उमेदवारी जाहीर होताच राणांनी प्रचाराला सुरूवात केली. नवनीत राणा यांनी प्रचारादरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय असलेले संजय खोडके यांचा फोटो वापरला. त्यामुळं संजय खोडके (Sanjay Khodke) यांनी नवनीत राणा यांना सज्जड दम दिला.

आधी हल्लाबोल, नंतर थेट शरणागती….शिवतारेंची विश्वासर्हता वाऱ्यावर! 

संजय खोडके यांनी नवनीत राणांना यांच्या नावे निवदेन पाठवून यासंदर्भात खुलासा करण्याची मागणी केली. माझ्या संमतीशिवाय अमरावती लोकसभेच्या निवडणुकीसाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर माझा फोटो वापरले जात आहेत. समाज माध्यमांवर किंवा पत्रकांवर माझे फोटो लावण्याची मला काहीही कल्पना नाही. माझे फोटो समाजमाध्यांवर किंवा पत्रकांवर वापरण्याबात माझी व्यक्तीगत अनुमती देखील घेतली नाही. ही बाब आदर्श आचार संहितेचं उल्लंघण करणारी असल्याचं खोडके म्हणाले.

नांदेडमध्ये अशोक चव्हाण-नाना पटोलेंमध्ये फिक्सिंग, प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप

अन्यथा कारवाईला सामोरे जा…
नवनीत राणा यांनी वापरलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर तसेच प्रिंट मीडियातून जाहीर खुलासा करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता फोटो वापरल्यास थेट निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करण्याचा इशारा संजय घोडके यांनी दिला आहे.

संजय खोडके हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2019 च्या निवडणुकीत संजय खोडके हे राष्ट्रवादीकडून अमरावती लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांचा पत्ता कट करत नवनीत राणा यांना पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हापासून ते पक्षापासून दूर होते. सध्या ते अजित पवार गटात आहेत. खोडके हे महायुतीत असूनही ते नवनीत राणा यांना पाठिंबा देण्यास तयार नाहीत. याआधी बच्चू कडू यांनी राणांविरोधात उमेदवार दिला. जिल्ह्यातील दोन मराठा नेते विरोधात गेल्याने राणा समर्थकांची अस्वस्थता वाढली आहे.

follow us