Download App

Sanjay Raut: ‘खोटारडे कुठचे!’ चार राज्यांचा उल्लेख करत राऊतांच टीकास्त्र

Sanjay Raut : चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही. मात्र पंतप्रधान मोदी वन नेशन, वन इलेक्शनची गोष्ट करतात असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut Attack On PM Narendra Modi: चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही. मात्र पंतप्रधान मोदी वन नेशन, ( PM Narendra Modi ) वन इलेक्शनची गोष्ट करतात असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात (Sanjay Raut Attack) वन नेशन वन इलेक्शन ते चार राज्यातल्या निवडणुका एकत्र येऊ शकत नाही.(Assembly Election) झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र फक्त चार राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही. ते वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करत आहेत खोटारडे कुठले लोकांना मूर्ख बनवत आहेत. महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे. झारखंडमध्ये तुम्हाला हरण्याची भीती आहे म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा आहे म्हणून तुम्ही या दोन राज्यांना निवडणुका घ्यायला तयार नाही, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.

https://www.youtube.com/watch?v=MdD-HAlPIcw

पुढे म्हणाले की, तुम्हाला तुमची लाडकी बहीण योजनेच्या अजून एक हप्ता महिलांना द्यायचा आहे लाज म्हणून. तुम्ही इलेक्शन घेत नाही नाहीतर घ्या ना इलेक्शन. तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणत आहात ना सुरुवात करा या चार राज्यांच्या निवडणुका घ्या करा मागणी असा टोला देवेंद्र फडणवीस याना लगावला. मोदी खोटं बोलतात लाल किल्ल्यावर, लाल किल्ल्यावरून खोटं बोलणारा प्रधानमंत्री आहे. महाराष्ट्रात इलेक्शन तुम्ही घेऊ शकत नाही. झारखंडचा इलेक्शन तुम्ही घेऊ शकत नाही. चार राजाच्या निवडणुका तुम्ही इलेक्शन घेऊ शकत नाही आणि तुम्ही मोठे आले चला सोडून द्या, अशी टीका त्यांनी केली आहे.

PM Narendra Modi : महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य, मोदींची मोठी घोषणा

देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्यांचे राज्य चालू होते शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीने सध्या फडणवीस आणि त्यांचे लोक काम करत आहेत. अनागोंदी, अराजक, लुटमार हे सर्व घाशीराम कोतवाल आहेत तीन. या तीन घाशीराम कोतवाल यांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे. आणि घाशीराम कोतवाल यांचा इतिहास काय आहे, हे आम्ही महाराष्ट्राला आता लवकरच सांगू अक्षरशः लुटमार खोटारडेपणा, अराजक असा तो काळ होता. महाराष्ट्रात हे असे कोण लागून गेले यांच्या योजना म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू. महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्य केलं नाही का? या महाराष्ट्राला शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले आणि 70 वर्षापेक्षा जास्त काळ याच्यात मुख्यमंत्री होऊन गेले. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल तर तुम्ही या राज्याचे महाराष्ट्राचा महाभारत समजून घ्यावं.

Sanjay Nirupam On Sanjay Raut : संजय राऊत आता काँग्रेसही संपवणार, काँग्रेसमधील नेत्याचा हल्लाबोल!

या महाराष्ट्रात ही योजना बंद करु जे सुडाच राजकारण आहे ते फडणवीस यांनी सुरू केले आणि आम्ही त्याच्यामध्ये नाही आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही. त्यांना भीती का? वाटते की आमच राज्य जाईल ही त्यांची भीती आहे. आम्ही हरतो आहोत ही त्यांची भिती आहे म्हणून ते लोकांना धमक्या देवेंद्र फडणवीस देत आहेत. बाकी त्याचे इतर दोन जे पार्टनर आहेत त्यांच्याविषयी काही बोलण्याचा अर्थ नाही. पण देवेंद्र फडणवीस जे पडद्यामागून कपटकारस्थान करत आहेत आणि महाराष्ट्र ते उघड्या डोळ्याने पाहत आहे. चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाही अशा प्रकारची मानसिकता कोणत्याही चांगल्या सरकारची नसते चांगल्या राज्यकर्त्याची नसते.

Maharashtra Assembly Election : मविआचं जागा वाटप कसं होणार? पवारांनी सांगितला डिटेल फॉर्म्युला

नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नाव बदलून काँग्रेसच्या योजना चालवलेल्या आहेत नरेंद्र मोदी यांनी काहीही केलं नाही. काँग्रेसच्या ज्या योजना होत्या. वर्षानुवर्ष व गरिबांच्या बाबतीत, संरक्षणाच्या बाबतीत, सामाजिक न्याय बाबतीत या सगळ्या योजना त्यांनी फक्त नाव बदलली संस्थांची योजनांची इमारतींची आणि त्या चालू केल्या, योजना त्याच आहेत. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे. त्यांच्या सरकार जाणार यामुळे जलशिवार योजना सोडून द्या त्यांना काय उल्लेख करायला झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आता आपला गाशा गुंडाळ्याला सुरुवात करावी. महाराष्ट्र या राज्याची जनता त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नाही. ज्या प्रकारचं दळभद्री आणि घाणेरड डर्टी पॉलिटिक्स राजकारण या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केलं त्याचा अंत आता जवळ आला आहे एवढेच मी सांगतो. मोदी आणि शहांच बहुमत गमावलं ते महाराष्ट्रमुळे. तो महाराष्ट्र तुम्हाला सत्ता देईल का? अजिबात देणार नाही, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

follow us