Download App

कथित खिचडी घोटाळा प्रकरण : संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना ईडीचं समन्स

Image Credit: Letsupp

Sunil Raut ED Notice : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणला ईडीकडून अटक झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या बंधूंनाही ईडीकडून समन्स बजाण्यात आलं आहे. सुनिल राऊ यांना खिचडी घोटाळ्या प्रकरणात ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मनोज जरांगे हे मनुवादी, मुंबईच्या आंदोलनात घातपात…; उपराकार लक्ष्मण मानेंचे धक्कादायक दावे

कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी 17 जानेवारीला सूरज चव्हाणला ईडीने अटक केली होती. दरम्यान, न्यायालयात हजर केले असता ईडीने सूरज चव्हाणची 8 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्याला चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. सूरज चव्हाण यांचे वकील दिलीप साठाळे म्हणाले की, या घोटाळ्यात सूरज चव्हाण यांचा सहभाग नाही, असे आम्ही न्यायालयाला सांगितले.

‘काहीही हरकत नाही’: मराठा-ओबीसी वादात मध्यस्थी करण्याची आंबेडकरांची ऑफर जरांगेंनी स्वीकारली

एफआयआरमध्ये सूरज चव्हाण याचे नाव नाही. सूरज चव्हाण उत्तर देत नसल्यामुळेच त्याला अटक करण्यात आली आहे. सुरज चव्हाणला पुढील पाच दिवस म्हणजेच २२ जानेवारीपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सूरज चव्हाण हा राजकीय व्यक्तीशी संबंधित असल्याने त्याला आरोपी म्हणता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

पहाटे चार वाजता दीड तास खलबत; सरकारचा तीन कलमी प्रस्ताव फेटाळत जरांगे पुण्यात दाखल

काय आहे खिचडी घोटाळा?
कोरोना काळाता स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही, अशा कामगारांसाठी लॉकडाऊन दरम्यान जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी पुरविण्याचे कंत्राट दिले होते.

अयोध्येत रामाचं राज्य पण महाराष्ट्रात गद्दारांचं राज्य, संजय राऊतांचा नाशिकमधून हल्लाबोल

मुंबई महापालिकेने सांगितले की, पहिल्या चार महिन्यांत चार कोटी खिचडी पाकिटांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, या कामात घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. यामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाणचे नाव घेण्यात आले.

follow us

वेब स्टोरीज