ईव्हीएम विरोधात आमदारकीचे बलिदान देणार, उत्तमराव जानकर अन् सुनील राऊतांची घोषणा
MLA Uttamrao Jankar – विधानभवनात आमदारांचा शपथविधी सुरु झाल्यानंतर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्षांच्या आमदारांनी ईव्हीएमवर (EVM) शंका घेत सभात्याग केला. तसेच त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी आपली आमदारकी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. तर ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनीही मी राजीनामा देऊन मतपत्रिकेवर मतदान घेण्यास तयार असल्याची भूमिका घेतली.
‘हा त्यांचा रडीचा डाव’, ईव्हीएमच्या आरोपांवरून DCM अजित पवारांनी विरोधकांना सुनावले…
मारकडवाडी गावात मतदानाच्या आकडेवारीत घोळ असल्याचं सांगून तिथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निवडणूक आयोगाने यासाठी परवानगी दिली नाही, तसेच पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करत ग्रामस्थांचा हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, यावर बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले, ईव्हीएमच्या विरोधासाठी शरद पवार उद्या (8 डिसेंबर) मारकडवाडीत येथे येणार आहेत. माझ्या विरोधात पराभूत झालेले भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि मी मतपत्रिकेवर पेपरवर मतदान घेण्यासाठी आग्रही आहत. त्यासाठी मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर फेर मतदान घेण्याची परवानगी दिल्यास मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार असल्याची भूमिका जानकर यांनी घेतली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत मोठी जबाबदारी मिळणार?, काय आहे नक्की विषय?
येत्या १५ दिवसांत बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन राज्यात आणि देशात जे संशयाचे धुके निर्माण झाले, ते बाजूला करावे, असा आमचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोगाला आम्ही पत्र देत आहोत. त्यांनी यासाठी होकार दिल्यानंतर मी राजीनामा देणार आहे. ईव्हीएमच्या विरोधात कोणीतरी बलिदान दिले पाहिजे. यासाठी मी तयार आहे, असेही उत्तमराव जानकर यावेळी म्हणाले.
पुढं ते म्हणाले, जे ईव्हीएमच्या माध्यमातून सत्तेत आलेत, त्यांना केवळ 25.1 टक्के मते मिळाली. उर्वरित मते ज्यांना मिळाली त्यांचा पराभव झाला. यशोमती ठाकूर, बच्चू कडू हे सभागृहाच्या बाहेर कसे राहू शकतात? असा सवाल करत माझ्या आपल्या मतदारसंघात सुमारे एक लाख मते वळवल्याचा आरोपही उत्तमराव जानकर यांनी केला. मी विजयी झालो असलो तरी माझ्या मतदारसंघातील जनतेत तीव्र नाराजी आहे, असंही ते म्हणाले.
तर ठाकरे गटाचे विक्रोळी मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांनीही अशीच घोषणा केली. आमदारकीचा राजीनामा देऊन मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासा मी तयार आहे, अशी पोस्ट त्यांनी केली. माझ्या मतदारसंघात मी किमान 40,000 ते 50,000 मतांच्या फरकाने विजयी होणे अपेक्षित असताना, मी केवळ 16,000 मतांच्या फरकाने विजयी झालो आहे, हा निकाल विक्रोळीतील जनतेलाही मान्य नाही, त्यामुळे मी राजीनामा देऊन मतपत्रिकेवर मतदान घेण्यास तयार आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.