Download App

अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांनी पक्ष फोडले; राऊतांनी दावा ठोकत वातावरण तापवलं

  • Written By: Last Updated:

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती. ही अटक टाळण्यासाठीच फडणवीसांनी पक्ष फोडल्याचा थेट दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. आपल्याला अटक होईल या भीतीने फडणवीसांवी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे. राऊतांच्या दाव्यानंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. (Devendra Fadnavis Scare To Arrest In Phone Tapping Case Says Sanjay Raut)

फडणवीसांची CM पदाची ऑफर; आदित्य ठाकरे म्हणतात, भाजपशी करार झाला होता पण…

शिंदेंच्या मुलाखतीवर बोलताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची यांची एक मुलाखत समोर आली आहे. ज्यात शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचे सरकार फडणवीस,आशिष शेलार, प्रवीण दरेकर आदींसह अन्य नेत्यांना अटक करणार होते त्यासाठीची रणनीतीदेखईल आणख्यात आली होती असे खळबळजनक खुलासा केला आहे. परंतु, या सर्वांना अटक का होणार होती? त्यांनी काहीतरी केले असेल म्हणूनच त्यांच्यावर कारवाई केली जाणार होती असे म्हणत राऊतांनी कोणीही कारणाशिवाय कोणाला अटक करते का ? असा सवाल केला आहे. तसेच व्यक्ती नाही तर, सरकार कारवाई करते असे स्पष्टीकरण देत शिंदेंनी त्यांना मोदी सरकार का अटक करणार होते? याचे उत्तर द्यावे.

दोन आमदार अन् एका राज्यसभा खासदाराने गेम केला; फडणवीसांच्या भेटीनंतर विनोद पाटलांनी सांगितलं

फडणवीसांवर गुन्हे त्यांना होती अटकेची भीती

फडणवीसांवर बोलताना राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांवर फोन टॅपिंगचे आरोप होते. त्या प्रकरणात त्यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. फडणवीसांच्या हुकूमावरून तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी विरोधकांचे फोन टॅप केले होते. या सर्व प्रकणात फडणवीसांवर गुन्हे दाखल झाले आणि यात आपल्याला अटक होऊन शिक्षा होऊ शकते याची त्यांना भिती होती. त्यामुळेच अटकेच्या भीतीपोटीच देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावल्याचे राऊत म्हणाले. फडणवीस, गिरीश महाजन, दरेकर, शेलार, प्रसाद लाड हे लोकं कायद्याच्या दृष्टीने अनटचेबल आहेत का ? यांना कोणी हात लावू शकत नाही का ? असा सवालही यावेळी राऊतांनी उपस्थित केला.

जेलमध्ये जायची वेळ येऊ म्हणून शिंदे रडले, भीतीने पक्ष सोडून पळाले; राऊतांचा गौप्यस्फोट

कायद्याच्या दृष्टीने जर त्यांनी काही अपराध केले असतील आर्थिक गुन्हे असतील इतर काही अपराध केले असतील तर त्यांना कायदा हात लावू शकत नाही ते काही कायद्याच्या वर आहेत का ? या देशात पंतप्रधानांवर कारवाई झाली आहे, राज्यपाल यांच्यावर देखील कारवाई झाली आहे. शिवाय विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना मोदी सरकारने अटक केली आहे. अनेक मंत्री आमदार खासदार यांना महाराष्ट्रात आणि देशभरात अटक झाली आहे. मग हे पंचक आहे ज्यांची नावे शिंदे यांनी घेतली आहे त्यांच्यावर अपराध असतील आणि सरकार त्याची चौकशी करत असेल तर त्यांचा तीळपापड का व्हावा ? असे राऊत म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज