फडणवीसांची CM पदाची ऑफर; आदित्य ठाकरे म्हणतात, भाजपशी करार झाला होता पण…

फडणवीसांची CM पदाची ऑफर; आदित्य ठाकरे म्हणतात, भाजपशी करार झाला होता पण…

Aditya Thackeray Criticized BJP : राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. कडाक्याच्या उन्हात प्रचार सभा आणि मेळाव्यांतून राजकीय वातावरण ढवळू लागलं आहे. राजकीय नेत्यांच्या मुलाखतीही चांगल्याच गाजत आहेत. याआधी उद्धव ठाकरे यांनी एका (Uddhav Thackeray) मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत (Devendra Fadnavis) खळबळजनक दावा केला होता. फडणवीस आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून दिल्लीला जाणार होते, असा दावा ठाकरेंनी केला होता. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनीही (Aditya Thackeray) मोठा खुलासा केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी नुकतीच टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ठाकरे म्हणाले, आमचा 2019 मध्ये भाजपसोबत एक करार झाला होता. पण काही कारणांमुळे हा करार पूर्णत्वास जाऊ शकला नाही. त्यानंतर 2014 मध्ये सुद्धा भाजपने करार मोडला. याचं कारणही होतं. सर्वेक्षणात त्यांना स्वबळावर निवडणूक जिंकू असं वाटत होतं. त्यानंतर भाजपने 25 वर्षे जुनी युती तोडली. भारतीय जनता पार्टीची वृत्ती ही वापरा आणि फेका अशी आहे.

‘आदित्यला CM पदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते’ ठाकरेंच्या दाव्याने खळबळ!

तुम्ही मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती का असे विचारले असता ठाकरे म्हणाले, एक दिवस शिवसैनिक मुख्यमंत्री होणार हे वचन आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं. पण, एखाद्या पक्षाने प्रशासनातील निम्मा वाटा आणि समान जागावाटपाचं आश्वासन पाळलं नाही. भाजपनं आमच्या पाठीत अनेकदा वार केले. एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) शिवसेनेत बंडखोरी केली. पण त्यांनी शिवसेना सोडली. त्यामागे खरं कारण स्वतःला तुरुंगात जाण्यापासून वाचवणं हेच होतं. तुरुंगात जाणे टाळायचे असल्यानेच आमच्यापासून एक एक आमदार दूर होत गेला. भाजपने त्यांना बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री केलं असा आरोप आदित्य ठाकरे यांनी या मुलाखतीदरम्यान केला.

महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या कंत्राटाची चौकशी करण्यात येईल. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसह कुणालाच सोडणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला. आम्ही भ्रष्टाचाराचे जे आरोप आतापर्यंत केले आहेत त्या सगळ्यांचे पुरावे आमच्याकडे आहेत. ऑक्टोबरमध्ये ज्यावेळी आमचं सरकार राज्यात येईल त्यावेळी आम्ही या घोटाळ्यांची चौकशी करू.

मुंबईच्या स्वच्छतेवरून Aaditya Thackeray यांचा सरकारवर निशाणा; भाजप म्हणते जरा लाज वाटू..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube