Sanjay Raut on Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी भाजपविरोधी (BJP) पक्षांची मोट बांधून इंडिया (INDIA) आघाडीची स्थापना केली. अनेक विरोधी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले. गेल्या काही दिवसांपासून वंचितचा इंडियात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आज मविआने प्रकाश आंबेडकरांना जागावाटपाच्या बैठकीसाठी निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, आंबेडकरांनी या बैठकीला जाणं टाळलं. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाष्य केलं.
IND vs ENG : पहिला दिवस भारताने गाजविला! जैस्वालने इंग्लिश गोलंदाजी फोडून काढली
महाविकास आघाडीच्यावतीने नाना पटोलेंनी आंबेडकरांना बैठकीला येण्यासंदर्भात पत्र पाठवलं होतं. त्यावरून आंबेडकर चांगलेच संतापले होते. मविआसंबंधी निर्णय प्रक्रियमध्ये कोणताही अधिकार नसतांना त्यांच्या सहीने वंचितला कसं काय निमंत्रण पाठवलं, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज महाविकास आघाडीची जागा वाटप बैठक पार पडली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली सभा साडेसहा वाजता संपली. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांशी सविस्तर चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी ही एकसंघ आहे. आम्ही प्रसन्न मुद्रेने बाहेर आलो आहोत. महाराष्ट्रातील एकूण 48 जागांवर चर्चा झाल्याचं राऊत म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांविषयी विचारलं असता राऊत म्हणाले, आजच्या मॅरेथॉन बैठकीत प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर 30 जानेवारीला होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आम्हा सर्व नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना पत्र पाठवले आहे. त्यांना महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या नेत्यांचे मिळून पत्र हवं होतं. तसे पत्र आम्ही त्यांना पाठवलं आहे. त्यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा झाली. तसंच दिल्लीतही नेत्यांचीही चर्चा झाली आहे. त्यामुळे भविष्य काळात आम्ही एकत्र काम करू, अस राऊतांनी सांगतिलं.
सर्व्हेचं नाटकच, सरकार क्रूर पद्धतीने खेळतंय; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत आव्हाडांचा घणाघात
देश वाचवायला हवा. संविधान वाचले पाहिजे, देशातील हुकूमशाही नष्ट झाली पाहिजे, अशी भूमिका महाविकास आघाडीची आहे. आणि तीच भूमिका प्रकाश आबेडकर यांचीही आहे. त्यामुळं आम्ही त्यांना घेऊन पुढं जाणार आहोत. राजू शेट्टी यांच्याशीही चर्चा सुरू आहे. असं राऊतांना सांगितलं.
जागा वाटपासंदर्भात विचारलं असता राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीची प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीची आहे. त्यामुळे कुणीही फॉर्म्युल्यानुसार जाऊ नका. राष्ट्रवादीची जागा शिवसेनेची आहे. वंचितची जागा राष्ट्रवादीची, तर राष्ट्रवादीची जागा काँग्रेसची आहे. म्हणजे, सर्व घटक पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत, असं राऊत म्हणाले.
नितीश कुमार हे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. त्यावरही राऊतांनी भाष्य केलं. नितीश कुमार इंडिया आघाडीला सोडून जाणार नाहीत. ते आमच्यासोबत राहतील, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.