Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अखेर लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकूण 9 संभाव्य उमेदवारांबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाची (Madha Loksabha) जागा शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना सोडली आहे.
Pankaja Munde: Pankaja Munde : राज्यात माझ्या निवडणुकीची चर्चा जास्त पण, आशीर्वाद द्यायलाच कुणी नाही
जागा आणि संभाव्य उमेदवार कोण?
बारामती-सुप्रिया सुळे
माढा-महादेव जानकर(रासप)
सातारा-बाळासाहेब किंवा श्रीनिवास पाटील
शिरुर-अमोल कोल्हे
नगर दक्षिण-निलेश लंके
बीड-बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे
वर्धा-अमर काळे
महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाट अजून ठरलेलं नाही. परंतु, महायुतीने माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नक्की केला आहे. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव होतं. त्यामुळे अकलूजमधील मोहिते गट कमालीचा नाराज झाला आहे. सध्या त्यांनी वेट अँड वॉचचं धोरण घेतलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हे कोडं कायम आहे. अशातच आता माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांची उमेदवारी फिक्स झाली असल्याचं म्हटलं आहे.
…तर मी बारामतीसाठी ‘कमळ’ हाती घेणार; शिवतारेंच्या भूमिकेनं अजितदादा ‘चेकमेट’ होणार
महादेव जानकर यांनी माढा आणि परभणी या दोन्ही मतदारसंघात उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यानंतर जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांत जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीदरम्यान, महादेव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवारांची चर्चा केली असल्याचं सांगितलं जात आहे.
‘गट फुटला म्हणून पवार कुटुंबात फूट नाही’; पवारांच्या बहिण सरोज पाटलांनी थेट सांगितलं
दरम्यान, शरद पवार यांच्याकडून लोकसभेसाठी बारामती, वर्धा, बीड, नगर, शिरुर, सातारा, आणि माढा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या संभाव्य नावांवर चर्चा सुरु आहे. अशातच आता अहमदनगर दक्षिणेतून निलेश लंके, बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे, वर्ध्यातून अमर काळे तर बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि माढ्यातून महादेव जानकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.