Download App

Exclusive : अजितदादांच्या पॉलिटिक्समध्ये काय कमी? ‘त्या’ गोष्टींचा उल्लेख करत शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar LetsUpp Exclusive Interview : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लेट्सअप मराठीला एक खास मुलाखत दिली.

Sharad Pawar LetsUpp Exclusive Interview : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लेट्सअप मराठीला एक खास मुलाखत दिली. (Maharashtra Politics) त्यात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुतण्या अजितदादा पवार यांच्या (Ajit Pawar) पॉलिटिक्समध्ये काय कमी? या गोष्टींबद्दल शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं. नेमकं काय म्हणाले चला तर मग जाणून घेऊया…

उपमुख्यमंत्री आणि पुतण्या अजितदादांच्या (Ajit Pawar) पॉलिटिक्समध्ये काय कमी? याबाबत त्यांना विचारले असता शरद पवार स्पष्टच म्हणाले की, अजितच ठीक आहे. (Maharashtra Politics) त्याची कष्ट करायची तयारी असते. म्हणजेच सकाळी लवकर उठून तयार होऊन जिल्हा परिषदेच्या कामाच्या संबंधित त्याने काही आखणी केलेली असेल. त्याची अंमलबजावणी नीट होते की नाही या सर्व गोष्टीकडे अजितचे बारकाईने लक्ष असतं. ती त्याची अत्यंत जमेची बाजू आहे.

दुसरी बाजू म्हणजे, समजा समाजकारणामध्ये लोकांच्यात तुम्ही असताना, काही भूमिका मांडताना काही पथ्य आणि मर्यादा या पाळल्या पाहिजेत. सगळेच तुमच्या पुढे येणाऱ्या व्यक्तींची तुमच्या प्रति मांडणी ही योग्य आहे का? तुम्हाला राजकीय क्षेत्रात तुम्ही असाल तर लाखो लोकांना तुम्ही भेटता. ते तुम्हाला मान्य असेल असं नाही. मान्य नसेल समजा तुमची लगेच टोकाची प्रतिक्रिया देणे हा त्याचा दृष्टीकोन योग्य नाही. तो सुधारावा, याच्यासाठी मी अनेकदा पूर्वीपासून बोलत असे. पण त्याचा स्वभावचं तसा आहे. तो अजून तरी बदलेला दिसत नाही.

विरोधी पक्षनेता बोलायला लागताच नेहरू मागे फिरले, अन्….; शरद पवारांनी सांगितला किस्सा…

दुसरी गोष्ट म्हणजे सुसंगतता राजकारणात सुसंगतता पाहिजे. काहीही असलं तरी हल्ली आता त्या लोकांनी जे निर्णय घेतले ते लोकांच्यासमोर मते मागताना कशासाठी मते मागितली. कोणत्या पक्षासाठी मते मागितली? कोणत्या विचारासाठी मते मागितली. यांची भाषणे काढून दाखवता येतील. मोदींच्या अनेक धोरणावर त्यांनी कठोर टीका केलेली आहे आणि एकदा उलट चित्र मांडले. त्याचा अर्थ सातत्य नाही. या सगळ्या गोष्टी आहे. पण ठीक आहे. पुढे त्यांना अजित पवारांच्या पत्नी सुमित्रा पवार हे राज्यसभेत त्यांच्यासोबत असतील याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, खरं सांगायचं म्हणजे मी सभागृहात त्यांना एकदाही पाहिलेलं नाही.

अर्थात आणि मी काय जास्त नसतो. चार दिवसाचं पार्लमेंट होत. कदाचित अकरा वाजता मी जातो असं नाही. एखाद्या दिवशी दोन वाजताही जातो. तीन वाजता जातो. ज्यावेळी एकदा विषयी महत्वाचा असेल, त्या विषयांच्या चर्चच्या पूर्वी मी जातो . कदाचित त्या वेळेवर गेल्या असतील. नंतर एक- दोन वाजल्यानंतर कदाचित घरी गेल्या असतील. मला काय पाहता आलेले नाही. ठीक आहे वेळ लागेल, लगेच्या लगेच लोक तयार होत नाहीत. वेळेनुसार संधी मिळाली. ती संधी चांगले काम करून आपले व्यक्तिमत्तव संसदीय कामाला कसं उभारता येईल. याची काळजी घेणे ही त्याची जबाबदारी आहे, बघूया…असे ते यावेळी म्हणाले.

Exclusive: देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार? शरद पवारांना तर तसंच वाटतंय..

पुढे त्यांना उद्धव ठाकरे यांच्याविषयी विचारले, त्यावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा सुद्धा, त्यांना शारीरिक प्रॉब्लेमस् आहेत. त्यांच्या बाकी काम करायला काही कमतरता वाटत नाही. पण वेळ… वेळ कसा द्याचा. मुख्यमंत्र्यांना फार वेळ काढावा लागतो. लोकांना बोलायला, अधिकाऱ्यांशी सगळ्या गोष्टीला. या सर्व गोष्टींना त्यांच्या प्रकृतीच्या काही अडचणीमुळे त्यांना त्या मर्यादा आहेत आणि ते एकदम डायरेक्ट सीएम झालेत. त्याचा थोडा परिणाम होतो असे ते यावेळी म्हणाले.

follow us