Nana Patole News : प्रादेशिक पक्षांना काँग्रेस हाच पर्याय असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भाकीतावर पहिली प्रतिक्रिया दिलीयं. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) अनेक प्रादेशिक पक्ष एकवटतील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान केलं. पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीयं. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडलीयं.
शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकारणात वेगवेगळा सूर आवळण्या येत आहे. पवारांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही भाष्य केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत, या प्रादेशिक पक्षांना काँग्रेस हाच पर्याय असून प्रादेशिक पक्ष भाजपमुळे ग्रासलेले आहेत, त्यामुळे सर्वच पक्षांना काँग्रेस हाच पर्याय असल्याचं वाटत आहे, त्याच आधारावर शरद पवार यांनी वक्तव्य केलं असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. अनेक म्हणजे त्यामध्ये कोणताही पक्ष असू शकतो, सगळे पक्ष आणि अनेक पक्ष यामध्ये अंतर आहे, असं सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केलं.
काय म्हणाले होते शरद पवार?
पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत राहून चांगल्या समन्वयाने काम करतील. यातील काही प्रादेशिक पक्ष त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असं शरद पवारांनी एका मुलाखतीत स्पष्ट केल्यानंतर हा निकष तुमच्या पक्षाला लागू होत नाही का? असा सवाल त्यांना करण्यात आला.त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, मला राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात कोणताच फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची विचारसरणी मानणारे आहोत. आता आमच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार का याबाबत माझ्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.