Sharad Pawar On JP Nadda : भाजपची (BJP) मातृसंस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे (RSS) पाहिले जाते. संघाच्या मुशीतून तयार झालेले अनेक नेते भाजपमध्ये सक्रीय आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांनी संघ आणि भाजपबाबत मोठं विधान केलं. पूर्वी आएसएसची गरज होती, पण, आता भाजप सक्षम असल्याचं नड्डा म्हणाले. त्यावर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं.
पराभवाच्या भीतीने भाजपने रामाला मैदानात उतरवलं; घाटकोपरमधील बॅनरबाजीवरून राऊतांचे टीकास्त्र
शरद पवारांनी एक वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. जेपी नड्डा यांनी संघाबाबत केलेल्या विधानाविषयी विचारले असता ते म्हणाले की, भाजपमध्ये एक काळ असा होता की त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती. पण आता भाजपने त्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला आहे. भाजप स्वतःचा कारभार स्वतः चालवण्यासाठी सक्षम आहे, असे मी म्हणत नाही, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच तसं सांगितलं. संघ विचारांनी बळकट असलेल्या भाजपाने जर संघाबाबत असं म्हटलं तर मग भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या दोन्ही पक्षांसाठी ही धोक्याची घंटा आहे, असा इशारा पवारांनी दिला.
विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली! उद्या बारावी बोर्डाचा निकाल; वाचा, निकाल कसा पाहायचा
पुढं बोलतांना पवार म्हणाले, ज्या दिवशी भाजपची गरज संपेल, त्यादिवशी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत अशीच भूमिका घेऊ शकेल, असं पवार म्हणाले.
मोदी सध्या खूप घाबरलेत
यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या खूप घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या. लोकांशी संवाद साधत असतांना ते वैयक्तिक हल्ले करत आहेत. देशासमोरे प्रश्न बाजूला ठेवऊन मला भटकती आत्मा म्हणणं आणि राहुल गांधींना शहजादा म्हणणं हे चुकीचं आहे. हे काही निवडणुकीचे प्रश्न नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
जेपी नड्डा काय म्हणाले होते?
भाजपला एकेकाळी आरएसएसची गरज होती. पण आज पक्षाचा विस्तार झाला आहे. भाजप आज स्वत: राज्य करण्यास सक्षम आहे. आरएसएस ही एक वैचारिक आघाडी आहे आणि ते त्यांचे काम करतात, असं नड्डा म्हणाले होते.