Sanjay Raut : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळाला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली. यावेळी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी तेथे आले. मुख्यमंत्री शिंदे स्मृतिस्थळाला भेट देऊन गेल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला. धक्काबुक्कीचीही घटना घडली. यानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. या राड्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट केले. शिवतीर्थावरील आदरणीय शिवसेनाप्रमुखांचे स्मृतीस्थळ पवित्र आहे. त्याचे पावित्र्य राखायला हवे. छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मृतीस्थळावर औरंग्याची पिलावळ जाणे मान्य नाही त्याप्रमाणे शिवतीर्थावर स्मृतीस्थळी अफझलखानाच्या अनौरस पिलावळीने जाणे बरे नाही. पावित्र्य भंग होईल. शिवसैनिक एका निष्ठेने भिडणाराच! जय महाराष्ट्र!
Maratha Reservation : सरकारच्या हालचाली वाढल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी कोणताही वाद नको, गालबोट लागायला नको म्हणून समंजसपणाची भूमिका घेत मुख्यमंत्री पूर्वसंध्येला दर्शन घ्यायला जातात. त्यामुळे आज ठाकरे गटाने तिथे दाखल होऊन वाद घालण्याची कोणतीही गरज नव्हती.परंतु, बाळासाहेबांना आपण गमावलंय या भीतीपोटी ते कोणत्याही थराला जात आहेत, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती.
नेमकं काय घडलं ?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11 वा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राज्यभरातून शिवसैनिक दर्शनासाठी येतात. काल संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी तेथे हजर असलेले ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आक्रमक झाले. मुख्यमंत्री शिंदे तेथून बाहेर पडल्यानंतर आणखी काही ठाकरे गटाचे कार्यकर्ते तेथे दाखल झाले. विशेष म्हणजे ठाकरे गटाते अनिल परब आणि सुभाष देसाई यांच्यासह ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते शिवतीर्थावर आले होते. त्यांनी स्मारकाच्या ठिकाणी शु्द्धीकरण केल्याचे सांगितले जात आहे. यावरून दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली.
एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंसमोर अक्षरश: रडले; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि शीतल म्हात्रे देखील समाधीस्थळी हजर होते. त्यांच्यासोबतही शेकडो कार्यकर्ते हजर होते. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आले. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की करण्यात आली. गद्दारांना हाकलून द्या, अशा घोषणा दिल्या गेल्या. यावरून परिस्थिती चांगलीच चिघळली होती. या घटनेचे व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत.