एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंसमोर अक्षरश: रडले; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंसमोर रडले असल्याचा गौप्यस्फोट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाआधी वर्षा निवासस्थानी नेमकं काय घडलं? त्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारण्यात आलं असल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.
नगर अर्बन बँकेत 322 कोटींंच्या ठेवी, ठेवीदारांना परत कधी मिळणार? प्रशासकांनी सांगितलं
ठाकरे म्हणाले, बंडाआधी उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांना बोलावलं होतं. त्यावेळी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं का? असं त्यांना विचारण्यात आलं होतं. तेव्हा एकनाथ शिंदे रडले आणि म्हणाले की, असं नाही केलं तर जेलमध्ये टाकतील असं करण्याचं वय नाहीये, गुन्ह्याखाली कधीही अटक होऊ शकते, खूप दबाव आहे. पण असंच म्हणत आहेत, आम्ही जाणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना रडूनच सांगितलं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
तसेच नोव्हेंबरमध्ये उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन झालं. त्याचवेळी आमच्या कानावर अनेक चर्चा येत होत्या. अनेक बातम्या येत होत्या काही आमदार येऊन सांगत होते, की भाजपकडून एवढी ऑफर येत आहे आघाडी तोडून भाजपसोबत जायंचे आहे हे सुरु आहे, त्यांनी या गोष्टीचाही विचार केला नाही की, वडिलांचं ऑपरेशन झालं आहे. त्याचं मन किती काळं असेल ज्या माणसाने तुम्हाला घडवलं तो माणूस रुग्णालयात आहे, त्याचा फायदा घेऊन स्वत:च्या करीअरबद्दल विचार करायचा, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
IGIDR मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती, महिन्याला मिळणार लाखभर पगार
जे 40 आमदार पळून गेले कारण त्यांना भीती होती त्यांनी जे खाल्ल ते पचवू शकले नाहीत, पण जे इमानदार प्रामाणिक होते ते आमच्यासोबत पक्षासोबत राज्यासोबत राहिले. बाकीचे गुजरात, गोवा, गुवाहाटीला पळाले आहेत. आताही मी त्यांची वाट पाहायला तयार आहे, एकनाथ शिंदे इथे या, तुम्ही सेशन घ्या ते का पळून गेले त्यावर चर्चा करु, सेशनमध्ये समोरासमोर चर्चा करु, मी या व्यासपीठावर बसतो समोर ते 40 आमदार अलीबाबा जे कोणी आहेत? ते का पळून गेले त्यावर युक्तीवाद झाला पाहिजे, असं खुलं चॅलेंजच आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. पळून गेलेले 40 आमदार खोटं का बोलले?, त्यानंतर परदेशी दौऱ्यावर चर्चा करु, भ्रष्टाचार सुरु आहे त्यावर चर्चा करु, मी विना कागदोपत्रे बोलतो त्यांनी कागदं घेऊन बसावं? असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड करण्याआधी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे रडले होते,. आपल्याला जेलमध्ये टाकतील या भीतीने ते रडले असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. याआधीही त्यांनी असा दावा केला होता, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “अरे ते जाऊदे. आदित्य ठाकरे अजून लहान आहेत”, असं प्रत्युत्तर शिंदेंनी दिलं होतं.