Download App

Lok Sabha Election: काहींना मतदानापासून रोखले, बीड, बारामतीमध्ये बोगस मतदान झाले; शरद पवारांचा गंभीर आरोप

पवार म्हणाले पंतप्रधानपदाचा चेहार कुणीही असू शकतो. चेहरा नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. अनेकदा पंतप्रधानपदाचा चेहरा नसताना निवडणूक झाली आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Some were prevented from voting, bogus voting took place in Beed, Baramati; Serious accusation of Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काही गंभीर आरोप केला आहे. काही लहान घटकांचे मते विकत घेण्याचा प्रयत्न झाला आहे. तर बीड व बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात बूथ कॅप्चर करणे, बोगस मतदान घडवून आणल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी केला आहे.

Pune Accident News : पोलिसांवर राजकीय दबाव? आमदार सुनिल टिगरेंनी दावा खोडला…

राज्यातील लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडली आहे. काही किरकोळ घटना वगळता मतदान शांतेत पार पडले आहे. परंतु एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, एक-दोन ठिकाणच्या घटना वगळता निवडणूक शांतेत पार पडली आहे. राज्यात नागरिक व निवडणूक यंत्रणेमुळे निवडणूक शांतेत पार पडते. हा महाराष्ट्राचा लौकिक आहे. परंतु काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला आहे. समाजातील लहान वर्गातील मते विकत घेण्याची प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी तक्रारी झाल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात रात्री दोन वाजता एक बँक उघडली गेली होती. काही जण गुन्हा दाखल झाला आहे. या गोष्टी कधी होत नसतात. काही ठिकाणी तुरळक घडल्या आहेत. निवडणूक योग्य पद्धतीने हाताळले गेली आहे. याचे मतदार आणि निवडणूक यंत्रणेला श्रेय द्यावे लागले.

सावधान, सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाची लाट, भारतात नवीन व्हेरियंटची एंट्री 

पण बारामती, बीड मतदारसंघातील बोगस मतदान, बूथ कॅप्टर करकणे याबाबत तक्रारी झालेल्या आहेत. हे गंभीर प्रकार आहेत. लोकांना मताला येऊ न दिले जाणे, याही तक्रारी झाल्या आहेत. या तक्रारींचे शहानिशा करायला हवी. असे करणाऱ्यांविरुद्ध निवडणूक यंत्रणेने सक्त कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. या घटनेतून म्हातारी मेल्याचे दुखः नाही पण काळ सोकतोय आहे, असेही पवार म्हणाले.

मोदींचा चेहरा किती चालला ?

इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, असा आरोप सत्ताधारी करत आहे. त्यावर पवार म्हणाले पंतप्रधानपदाचा चेहार कुणीही असू शकतो. चेहरा नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. अनेकदा पंतप्रधानपदाचा चेहरा नसताना निवडणूक झाली आहे. पंतप्रधानपदाचा चेहरा नाही हे सांगणे शहाणपणाचे लक्षण नाही. मोदींचा चेहरा किती चालला हे मतमोजणीनंतर समजेल, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

follow us

वेब स्टोरीज