Download App

‘पवारांवर परिवारवादाचं लेबल नव्हतं’ अजितदादांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं सणसणीत उत्तर

  • Written By: Last Updated:

Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडाळी करत अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाले. सध्या अजित पवार गट आणि शरद पवार गटात पक्ष चिन्हावरून संघर्ष सुरू आहे. सुरूवातीच्या काळात अजित पवारांनी शरद पवारांवर थेट टीका करणं टाळलं होतं. मात्र, काल बारामतीच्या कार्यक्रमात त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. मी साठीत ही भूमिका घेतली, काहींनी ३८ व्या वर्षी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खूपसून दादांना मागं सारल, असा टोला त्यांनी लगावला. यावर आता शरद पवार गटाच्याा खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाष्य केलं.

Arbaaz Khan Wedding: लग्न अरबाजचं चर्चा भाईजानच्या डान्सची.. वहिनीसोबत थिरकला ‘भाईजान’ 

आज माध्यमांशी बोलत असतांना सुप्रिया सुळेंना अजित पवारांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, अजित पवारांचं बंड आणि शरद पवारांनी तेव्हा घेतलेला निर्णय यात थोडा फरक आहे. त्याविषयी शालिनीताई पाटलांनी अनेकदा त्याविषयी सविस्तरपणे सांगितलं आहे. मात्र, पवार साहेब 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तसं राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दादांनाही मिळेल, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

आता शाळेतच शेतीही शिकविणार! पहिलीपासून कृषी अभ्यासक्रमाच्या विषयाची सुरुवात 

पुढं त्या म्हणाल्या, बारामती आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आशिर्वादाने जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले, तेव्हा भारतीय जनता पक्ष त्या सरकारमध्ये नव्हता. ती वेगळी चूल मांडतांना काँग्रेसमधील अनेक लोक त्यांच्यासोबत होते. पण त्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता. शिवाय, त्यांना परिवारवादाचं लेबल नव्हतं, असं सुळेंनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा माझे ऐकतात, असं अजित पवार म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देतांना सुळे म्हणाल्या की, मोदी-शाह त्यांचं ऐकत असतील तर स्वागत आहे. दादांच्या दरबारात आपण आपले प्रश्न मांडू. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव द्वावा, मराठा, धनगर, लिंगायत मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे त्याचाही आढावा दादांनी घ्यावी आणि तो प्रश्न मोदी-शाहांपुढं मांडावा, असं सुळे म्हणाल्या.

अजित पवार हे सातत्याने शरद पवारांनी पुन्हा विचार केला पाहिजे, असं आवाहन करत आहे, त्यांना खरचं पवारांची भीती वाटते का, यावर बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशात लोकशाही आहे. त्यामुळं प्रत्येकाला आपलं मन मोकळं करण्याचा अधिकार आहे…. दिल्लीवाले दडपणशाही करतात, आम्ही लोकशाही मानतो. आणि शरद पवारांवर टीका केली की, गेली साठ वर्ष हेडलाईन होतेच, असं सुळे म्हणाल्या.

एक कुठतरी थांबा, इकडंपण यायचं आणि तिकडपण जायंचं, हे चालणार नाही, अशा तंबी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली. यावरून तरी राष्ट्रवादीत फुट पडलेली दिसते, असं विचारलं असता सुळे म्हणाले, फुट पडलेली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारट आहेत. आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. राष्ट्रवादीत फुट नाही. माझा निवडमुक आयोगावर विश्वास आहे. आम्ही प्रांजळपणे आमची बाजू मांडली, आता न्याय मिळावा ही अपेक्षा आहे.

 

Tags

follow us