गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज (Dhangar society) आदिवासी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र, तरीही धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही. धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारला वारंवार धारेवर धरले. आजही त्यांनी एका कार्यक्रमातून धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत धनगर समाजाला आरक्षण (Reservation for Dhangar community) मिळवून देणार, असा निर्धार व्यक्त केला. (supriya sule said Due to the difference between the words Dhangar and Dhangarh, the government does not provide reservation)
बारामती शहरात आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हजेरी लावली होती. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांना अनेकदा सांगितलं की, धनगर आणि धनगढ हे दोन्ही शब्द एकच आहेत. एकाच समुदायासाठी हे शब्द वापरतात. फक्त उत्तरेत धनगड आणि महाराष्ट्रात धनगर म्हणतात, हाच काय तो यात फरक आहे. मात्र, ते काही केंद्र सरकारच्या लक्षात आलं नाही. धनगर समाजाला आरक्षण देणार नाही. एसटीचं आरक्षण धनगर समाजाला कदापी देणार नाही, अशी भाजपच्या खासदारांची भूमिका असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शांताबाईंना दरमहा मानधनासह घरकुल योजनेचा लाभ, बातम्या प्रसारित झाल्यानंतर सरकारला आली जाग…
त्या म्हणाल्या, भाजपची नेते मंडळी महाराष्ट्रात सांगतात की, धनगर समाजाला आरक्षण देणार अन् संसदेत आरक्षणाच्या विरोधात उभे राहतात. 2014 मध्ये आमचे सरकार आल्यास धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्ष देण्य़ात येईल, असं भाजप नेत्यांनी सांगितलं. मात्र, भाजप सरकार आल्यावरही त्यांनी आरक्षण देणार दिलं नाही. आताही त्यांचं सरकार आहे. पण, आरक्षण मिळत नाही. राज्यातील भाजप नेते आरक्षण देऊ असं सांगतात. मात्र, आता राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असूनही हा आरक्षणाचा प्रश्न सुटत का नाही, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने १९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र तो प्रस्ताव नाकारण्यात आला होता. आताही आरक्षणाचा प्रश्न नऊ वर्षापासून आम्ही मांडतोय. मात्र, केंद्र सरकारकडून अद्यापही त्यावर काही उत्तर आलं नाही. मात्र, आम्ही धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार, असं त्यांनी सांगितलं.