शांताबाईंना दरमहा मानधनासह घरकुल योजनेचा लाभ, बातम्या प्रसारित झाल्यानंतर सरकारला आली जाग…
Shanatabai Kopargoankar : आपल्या अदाकारीने तमाशा रसिकांना वेड लावणाऱ्या शांताबाई लोंढे-कोपरगावकर यांच्या सध्याच्या स्थितीच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अखेर सरकारला जाग आली आहे. शांताबाई लोंढे-कोपरगावकर यांना दरमहा मानधन ते घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या त्याना द्वारकामाई वृद्धाश्रमाात ठेवण्यात आलं असून आज जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांनी शांताबाईंची भेट घेऊन विचारपूस केली आहे.
सीतारामन यांचे बराक ओबामांना प्रत्युत्तर, ‘तुम्ही 6 मुस्लिम देशांवर बॉम्ब फेकले’
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्यावतीने सन्मान राखत शासकीय योजनांचा लाभ त्यांना मंजूर केला जाणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शांताबाईंच्या प्रकृतीची समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून विचारपूस केली. त्यांना सर्वतोपरी शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. मागील दोन दिवसांपासून शांताबाईंची वृध्दापकाळात परवड सुरू असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर माजी आमदार स्नेहलता कोल्हे, द्वारकामाई ट्रस्टचे सल्लागार सचिन तांबे व डॉ.अशोक गावित्रे यांनी त्यांना 24 जून रोजी द्वारकामाई वृध्दाश्रमात दाखल केले होते.
शरीराच्या तापमानात होतोय बदल, जाणून घ्या कोणत्या काय आहेत लक्षणे ?
जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्यासोबत जिल्हा प्रशासनाच्या महसूल, समाज कल्याण, नगरपालिका, पंचायती समिती या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिर्डी येथील द्वारकामाई वृध्दाश्रमात भेट घेतली. शांताबाई लोंढे सध्या त्यांचे भाचे कोंडीराम मार्तंड लोंढे व राजू मार्तंड लोंढे यांच्या समवेत गजानन नगर, कोपरगाव येथे राहात होत्या. ते त्यांचा सांभाळ करीत आहेत. परंतु वार्धक्य व त्यांची मानसिक अवस्था वेळोवेळी विचलित होत असल्याने ते बऱ्याच वेळा घराच्या बाहेर राहत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. यापुढे त्या द्वारकामाई वृद्धाश्रमात निवास करणार आहेत. शांताबाई यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांच्यावरील पुढील वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.
शांताबाई लोंढे-कोपरगांवकर यांना महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कला संचलनालय, मुंबई यांची वृद्ध कलावंत मानधन योजना सन-२००९ पासून त्यांना वर्ग ‘क’ कलाकार म्हणून दर महिन्याला २२५० रुपये मानधन मिळणार आहे. त्यांचे मे २०२३ पर्यंतचे मानधन त्यांच्या स्टेट बॅक इंडियाच्या बॅंक खात्यावर ८ जून २०२३ रोजी जमा झाल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी यावेळी सांगितले.
Yoga Tips : ‘हेडॅक’ कमी करायचाय? मग, मदत घ्या ‘या’ खास योगासनांची
ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे (कोपरगावकर) यांना कोपरगाव तहसीलदारांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभही मंजूर केला आहे. त्यानूसार त्यांना एक हजार रूपये दरमहा मानधन मिळणार आहे. दुबार रेशनकार्ड जिवित व ऑनलाईन करून शासनाच्या नियमाप्रमाणे अंत्योदय योजनेचा लाभ, तसेच केंद्र पुरुस्कृत कलाकार मानधन योजनांचा लाभ देण्याची
कारवाई लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
तसेच त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीची आस्थवाईकपणे केलेल्या चौकशीमुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर, कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले, राहता तहसीलदार अमोल मोरे, कोपरगाव गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, कोपरगाव मुख्याधिकारी शांताराम गोसावी, विस्तार अधिकारी बी.बी.वाघमोडे, समाजकल्याण निरीक्षक विनोद लाड, द्वारकामाई वृध्दाश्रमचे व्यवस्थापक बी.श्रीनिवास, सल्लागार सचिन तांबे, सामाजिक कार्यकर्त सुखलाल गांगवे आदी उपस्थित होते.