Sushma Andhare : राज्यात लाडकी बहिणी योजना राबवली जात आहे मात्र स्वतःच्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार देणाऱ्यांना लाडकी बहीण काय समजणार अशा शब्दात सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली. तसेच कंपन्या बाहेर जात आहेत महाराष्ट्राच्या पदरी केवळ निराशाच पडत आहेत. येड्यांची जत्रा आणि कारभारी सतरा अशी अवस्था सध्या महाराष्ट्राची झाली आहे असे शब्दात अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवरती जोरदार निशाणा साधला.
येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक आहे. त्यापूर्वीच आता पारनेरमध्ये राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली. ठाकरे गटाच्या वतीने पारनेरमध्ये महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याला ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे या उपस्थित होत्या. अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यावरती जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना अंधारे म्हणाले की गुवाहाटीला गेलेले गद्दार यांना मी सांगू इच्छिते बाळासाहेबांनी हयात असताना त्यांचा उत्तर अधिकारी कोण आहे हे सांगितलं होतं. शिवसेना खरी कोणाची हे जनतेला माहित आहे. महाराष्ट्राची अस्मिता घालविण्याचे काम त्या चाळीस गद्दारांनी केलं. रात्रीच्या अंधारात पळून जाणारे गद्दार हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे कलंक आहे अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटावरती कडव्या शब्दात हल्लाबोल केला.
शिंदे फडणवीस यांनी खिशातून पैसे नाही दिले…
एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खिशातून पैसे दिलेले नाही ते पैसे आज आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचेच आहे. मिळालेले पैसे हे तुमच्याच भावाचे तुमच्या घरच्यांचे आहे अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांवरती जोरदार निशाणा साधला. आपण सत्तेत आलो ते पण दीड हजार ते तीन हजार करू असं यावेळी अंधारे म्हणाल्या.
एकीकडे योजनांवरती खर्च करून राहिले मात्र दुसरीकडे नोकऱ्यांना ही बेरोजगारी वाढत चालली. लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार देणारे स्वतःच लाडकी बहीण योजना जाहीर करतायत अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर नामोल्लेख टाळत जोरदार टीका केली. येड्यांची जत्रा आणि कारभारी सतरा महाराष्ट्रावरती अन्याय होतोय. सगळं काही बाहेरच्या राज्यांना मिळते आणि इथं एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे महाराष्ट्र उपाशीच आहे. येड्यांची जत्रा आणि कारभारी सतरा अशा शब्दात अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. फडणवीस यांनी एवढा अभ्यास केला की त्यांची पदोन्नती व्हायचं तर डिमोशन झालं. मुख्यमंत्री पदाचा चेहरा उपमुख्यमंत्री झाला.
वन नेशन वन इलेक्शन केवळ म्हणतायेत मात्र ते घाबरलेले आहेत यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लांबणीवर पडलेल्या आहेत. यामुळे राज्यातल्या निवडणुका देखील पुढे ढकलण्याचा यांचा डाव आहे. लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून राजकीय पेरणी करू आणि नंतर विधानसभा निवडणुका घेऊ असं त्यांचा डाव आहे असं देखील अंधारे म्हणाल्या.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सर्वजण आता हे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत आणि जे काही आपल्या पक्षात येत नाही त्यांना ईडी, सीबीआयच्या माध्यमातून कारवाईच्या धमक्या देत आहेत. आज एवढ्या खालच्या स्तराचे राजकारण हे राज्यात सुरू आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देणे सुरु असल्याचे देखील यावेळी अंधारे म्हणाल्या. आमचा विरोध लाडक्या बहीण योजनेला नाही मात्र राजकारण्यांकडून सुरू असलेल्या बॅनर बाजीला आहे.
शाळेवर राग काढू नका; चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर शाळा अध्यक्षांना अश्रू अनावर
बहिणींवरती उपकार केल्याचे या माध्यमातून ते दाखवत आहेत. आज जनतेच्या पैशातून जाहिरात बाजी केली जाते. मात्र हाच पैसा गोरगरिबांसाठी खर्च करावा अशा शब्दात अंधारे यांनी अजित पवारांवर टीका केली.