Download App

अकलूज बोले अन् सोलापूर जिल्हा हाले ही स्थिती नाही; तानाजी सावंतांचा मोहिते पाटलांवर हल्लाबोल

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारसभेत बोलताना अरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मोहिते पाटलांवर जोरदार टीका.

  • Written By: Last Updated:

Tanhaji Sawant : आता काही 1947 चालू नाही. त्यामुळे तुम्ही म्हणालं आणि आम्ही ऐकू असं नाही. तसंच, जे वातावरण सध्या दिसतय तस नाही. 18 ते 29 वयोगटातील मोठा तरुण वर्ग आता मतदार आहे. (Tanaji Sawant) त्यामुळे अकलूज बोले सोलापूर जिल्हा हाले ही स्थिती नाही असं म्हणत आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

 

परिस्थिती बदलली आहे

पुढे बोलताना सावंत म्हणाले, सध्या अकलूज बोले आणि सालापूर जिल्हा हाले अशी परिस्थिती नाही. आम्ही लहान होतो तेव्हा अशी परिस्थिती होती. त्यामुळे आता कुणीही बुद्धीभेद करू शकत नाही. त्याचबरोबर परिस्थिती बदलली असून जो-तो आपल्या पद्धतीने मतदान करतो असंही सावंत यावेळी म्हणाले.

 

मोहीते यांना चहा पाजायला माणसं राहिली नाहीत

जिल्हातील परिस्थिती बदलली आहे. देवेंद्र फडणवीस आपण एकदा माढ्यात येऊ पाहा  किती परिस्थिती बदलली आहे. आज विरोधी उमेदवार धैर्यशील मोहीते यांना चहा पाजायला माणसं राहिली नाहीत अशी थेट टीका तानाजी सावंत यांनी यावेळी केली. तसंच, येथून सुमारे दोन ते सवादोन लाख मतांच लीड आपण देणार आहोत असंही सावंत यावेळी म्हणाले.

 

खालच्या भाषेत टीका

भाषणाच्या सुरूवातीला सावंत म्हणाले माझी जीभ नेमीच घसरते आणि ते महाराष्ट्राला माहिती आहे. यावेळी त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावरही खालच्या भाषेत टीका केली. तसंच, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावरही खालच्या भाषेत टीका केली. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

follow us