ताटाला भोकं पाडणारी औलाद, गद्दारी त्यांच्या नसा-नसात…; निंबाळकारांचे मोहिते पाटलांवर टीकास्त्र

ताटाला भोकं पाडणारी औलाद, गद्दारी त्यांच्या नसा-नसात…; निंबाळकारांचे मोहिते पाटलांवर टीकास्त्र

Ranjit Singh Naik Nimbalkar on Dhiryashil Mohite Patil: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. सातत्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपाच्या फैरी झडत आहे. आता महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळक (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीसांची सांगोल्यात सभा झाली. या सभेत बोलतांना निंबाळकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांचा जोरदार समाचार घेतला.

Mahadev Betting App प्रकरणी साहिल खानच्या अडचणी वाढल्या; छत्तीसगडमधून अटकेनंतर 1 मे पर्यंत पोलीस कोठडी 

निंबाळकर या सभेला संबोधित करतांना म्हणाले, आता विरोधात असलेले उमेदवार महिन्याभरापर्यंत आपल्यासोबत होते. सोबत जेवायचे. त्यांचं जेवणही जिरलं नसेल. रात्रीच ताटाला भोकं पाडणारी ही औलात आहे, गद्दारी यांच्या नसानसात आहेत, असा हल्लाबोल निंबाळकरांनी केलं.

पवारांनी तुमचं राजकारण संपवलं तेव्हा आम्ही साथ दिली; फडणवीसांची मोहिते पाटील कुटुंबावर टीका 

ते म्हणाले, मोहिते पाटलांच्या घरात ग्राममपंचायतीचा सदस्यपद. त्यांच्याच घरात झेडपी सदस्य, त्यांच्याच घरात आमदारकी आणि काऱखान्याचा चेअरमनही त्यांच्याच घरातला. उद्या शिपायाचं पदही ग्रामपंचायतीत भरायचं असेल तर ते एखादा मोहिते पाटील तिथं उभा करतील, अशी खोचक टीका रणजितसिंह निंबाळकरांनी केली.

पुढं बोलताना ते म्हणाले, धैर्यशीलच्या नावावर 31 गंभीर गुन्हे आहेत. लोकांची फसवणूक, मारहाण करणं असे गुन्हे या माणसाच्या नावावर आहे. असा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माणूस पवरांना आदर्श उमेदवार म्हणून सापडला, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोहितेंना तिकीट का मिळालं नाही, तर याचं कारण आहे त्याचं अॅफेडेव्हिट. भाजपला स्वच्छ प्रतिमेचा माणूस हवा होता. भाजपला सत्तेचं केंद्रीकरण नको होतं म्हणून पक्षानं तिकीट नाकरलं. हजारो शेतकऱ्यांच देणं देता येत नाही म्हणून दडपण टाकण्यासाठी त्यांनी सत्ता हवी, अशी टीकाही निंबाळकरांनी केली. विकास करायचा असं सांगतात. पण, पन्नास वर्ष सत्ता तर यांच्याच हातात होती. एक बंधाराही त्यांनी बांधला नाही. निकाल लागेल तेव्हा कमळच फुले, असा विश्वासही निंबाळकरांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube