जाती-जातीत विष कालवायचं काम पवारांनी केलं, रणजितसिंह निंबाळकरांची सडकून टीका

जाती-जातीत विष कालवायचं काम पवारांनी केलं, रणजितसिंह निंबाळकरांची सडकून टीका

Ranjitsinh Naik Nimbalkar on Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरू आहे. आज सांगोल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जाहीर सभा झाली आहे. माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांची प्रचारार्थ ही सभा झाली. या सभेत बोलतांना रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. जाती-जातीत विष कालवायंच काम पवारांनी केल्याची टीका निंबाळकरांनी केली.

Mahadev Betting App प्रकरणी साहिल खानच्या अडचणी वाढल्या; छत्तीसगडमधून अटकेनंतर 1 मे पर्यंत पोलीस कोठडी 

निंबाळकर म्हणाले, माढा मतदारसंघात देशाचे नेते शरद पवारांनी निवडणूक लढवली. पवारांचं राजकारणातलं वय पन्नास वर्ष आहे. मी बेचाळीसाव्या वर्षी खासदार झालो. माझा तेवढा अनुभवही नाही. पवारांनी मावळत्या सूर्याची शपथ घेऊन सांगोल्याचा पाणी प्रश्न मिटवल्याशिवया राहणार नाही, असं वचन दिलं होतं. मात्र, या ठिकाणी त्यांनी एकही बंधारा बांधला नाही. उलटं नीरा देवगडचं हक्काचं पाणी पवार बारामतीला घेऊन गेले. दिलं तर काहीच नाही. पवार निवडून इथून आले आणि याच मातीशी त्यांनी गद्दारी केली, अशी टीका रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केली.

पवारांनी तुमचं राजकारण संपवलं तेव्हा आम्ही साथ दिली; फडणवीसांची मोहिते पाटील कुटुंबावर टीका 

पुढं बोलतांना निंबाळकर म्हणाले, मान तालुक्यात एवढं बंधारे बांधले, अमुक नदीचं काम केलंय, कोणती सिंचन उपसा योजना मार्गी लावली? हे पवारांनी सांगावं. त्यांनी काम केली असतील तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन, पण त्यांनी कोणतीच विकास कामं केली नाही, असा घणाघात निंबाळकरांनी केला.

मराठा समाजाला सांगायचे तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. माळी समाजालाही तेच सांगायचे. धनगर समाजाचे नेते घरी बोलावून सांगायचे की, तुम्ही आरक्षणाचा लढा उभारा. निवडणूका आल्या की, जाती जातीत विष कालवायंच काम पवारांनी केलं. आरक्षणांचं भूत उभं करून विकासाचे कसे मुद्दे बाजूला पडतील, एवढं तंत्र पवारांना चांगलं जमलं. जाती-जातील भांडण कशी लावायची हे त्यांना चागंल ठाऊक आहे, असा खोचक टोलाही निंबाळकरांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube