Threat to kill mp sujay vikhe audio clip goes viral: अहमदनगर – नगर जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. भाजपचे खासदार व उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांना जिवे मारण्याची धमकीची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहेत. विखे यांचा जोरदार प्रचार सुरू असताना ही घटना घडल्या असल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
नवनीत राणांचं टेन्शन वाढलं! आनंदराज आंबेडकर पुन्हा लोकसभेच्या रिंगणात
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे वाहत आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा (Ahmednagar Lok Sabha) ही सध्या राज्यात गाजत आहे. पुन्हा एकदा सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनी प्रचार देखील आता सुरू केला आहे. ते प्रत्येक तालुक्यांमध्ये फिरत आहेत. येत्या काळात निवडणुका होणार असल्याने आता राजकीय समर्थकांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून एकमेकांवरती टीका टिप्पणी देखील केली जात आहे.
Beed Lok Sabha : बीडच्या मैदानात वंचित आघाडीची एन्ट्री! अशोक हिंगेंची उमेदवारी जाहीर
खासदार सुजय विखे यांना जिवे मारण्याची धमकी अशी एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे. वातावरण असल्याने आता सध्या गाव पातळीवरती केवळ राजकीय चर्चा या होत आहेत. समर्थक आणि विरोधकांमध्ये टीका टिपणी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशाच एका चर्चेवरून खासदार विखे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारेल अशी धमकी दिल्याचे एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते.
ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय ?
दोन व्यक्तींमध्ये चर्चा होत असल्याचे या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकण्यात येत आहे. या क्लिपमध्ये विखे यांना शिवीगाळ करत तसेच त्यांच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. दरम्यान जवळपास एका मिनिटांची असलेल्या क्लिप मध्ये मोठ्या प्रमाणात शिवीगाळ केल्याचे देखील समोर आला आहे. निवडणुकीपूर्वीच या घटनांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालं नसल्याचे देखील समजते आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लिपची लेट्सअप पुष्टी करत नाही.
क्लिपबाबत कोणीही निलेश लंके यांच्याबाबत संबंध जोडू नये
या क्लिपशी आपला काही संबंध नसल्याचे निलेश लंके यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ज्यांचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे. त्या निवृत्ती घाडगे यांनी आपण निलेश लंके यांचे कार्यकर्ते नसून शिंदे गटात काम करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. निवृत्ती घाडगे यांनी हा आपला आवाज नसून आपल्या नावावर खोटे-नाटे पसरविले जात आहे. मी स्वतः शिंदे गटात काम करीत असून आपला निलेश लंके यांच्याशी कसलाही संबंध नसल्याचा त्यांनी दावा केला आहे. आपली बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात आपण पोलीसांत तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.