Sushma Andhare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana ) विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) देखील शिंदे सरकारवर याच योजनेरवरून फडकारलं. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांनी या योजनेरवरून शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
क्षत्रिय, लढाऊ, 96 कुळी तर मग ‘ओबीसी’तून आरक्षण कशाला; लक्ष्मण हाकेंचा मार्मिक टोला
बार्टी, सारथीच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती अद्याप देण्यात आलेली नाही. सरकारने त्याचे पैसे लाडकी बहीण योजनेकडे वळवलेत, असा आरोप अंधारेंनी केला.
सुषमा अंधारे यांनी आज पुणे दौऱ्यावर असताना माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, पुण्यात गेल्या पाच दिवसांपासून बार्टी, सारथीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. हे सर्व विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. कारण त्यांना त्यांच्या संशोधनासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती अद्याप देण्यात आलेली नाही. दोन वर्षे झाले, त्यांना या शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाहीत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे न देता, त्याचे पैसे लाडकी बहीण योजनेकडे वळवले आहेत सरकारने हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला? हे चालणार नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
फडणवीसांनी मराठा, धनगर संपवला, त्यांना संपवा-संपवी खात्याचं मंत्री करा…; जरांगेंचे टीकास्त्र
पुढं त्या म्हणाल्या, राज्यातील 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणार की नाही हा मुद्दा आहेच. शिवया, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने का स्पष्ट केलं की, अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा वर्कर्स असतील किंवा भूसंपादनाचे पैसे असतील, यांचे सर्व पैसे सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी वळते केलेत. त्यामुळे गरजू लोकांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळत नाही. या सगळ्यावर सरकारकडे काय उत्तर आहे? असा सवाल अंधारेंनी केली.
सरकारने योजनांची अंमलबजावणी करावी. योजना राबविण्यास कोणाचाही विरोध नाही. पण, शासनाच्या तिजोरीत पैसा नसताना त्यांनी इतरांचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी का वळवलेत? याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना लाभाचे वितरण 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. आतापर्यंत सुमारे 1 कोटी 35 महिला पात्र ठरल्या असून 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.