Sushma Andhare : छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती उत्साहात साजरी केली जातेय. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) शिवजयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतांना मोठी चुक केली. राहुल गांधींनी शुभेच्छा देताना छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे भाजप (BJP) आक्रमक झाला आहे. मात्र, सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) राहुल गांधीची पाठराखन केली.
शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ठाकरेंचा शह; नवी रणनिती पक्षातील गळती थांबवणार?
राहुलजींच्या ट्विटवर बांगड्या फोडणाऱ्या भाजप भक्तूल्यांनी भगतसिंग कोषारीवर साधा निंदाजनक ठराव सुद्धा का मांडला नाही? तेव्हा कुठल्या बिळात लपून बसले होते?, असा सवाल अंधारेंनी केला.
शिवराय या आराध्यांच्या संबंधाने आम्ही संवेदनशील आहोत मात्र राहुलजींच्या ट्विटवर बांगड्या फोडणाऱ्या भाजप भक्तूल्यांनी भगतसिंग कोषारीवर साधा निंदाजनक ठराव सुद्धा का मांडला नाही किंवा राहुल सोलापूरकरवर कारवाई न करता कुठल्या बिळात लपून बसले होते याची आधी उत्तर द्यावी. @RahulGandhi
— SushmaTai Andhare (@andharesushama) February 19, 2025
सुषमा अंधारे यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी राहुल गांधींची पाठराखन करत भाजपला भगतसिंह कोश्यारी आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाची आठवण करून दिली आहे. अंधारेंनी लिहिलं की, शिवराय या आराध्यांच्या संबंधाने आम्ही संवेदनशील आहोत. मात्र राहुलजींच्या ट्विटवर बांगड्या फोडणाऱ्या भाजप भक्तूल्यांनी भगतसिंग कोषारीवर साधा निंदाजनक ठराव सुद्धा का मांडला नाही किंवा राहुल सोलापूरकरवर कारवाई न करता कुठल्या बिळात लपून बसले होते? याची आधी उत्तर द्यावी, असं अंधारेंनी म्हटलं.
‘चार्जशीटमध्ये फेरफार…’, बीड हत्याप्रकरणाबाबत मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
राहुल गांधीचे नेमके ट्वीट काय?
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्याऐवजी श्रध्दांजली वाहिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन आणि विनम्र श्रध्दांजली अर्पण करतो. आपले साहस आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असं राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.
भाजपकडून माफीची मागणी…
राहुल गांधी महाराष्ट्रातील जनतेचा आणि महापुरुषांचा सतत अपमान करत आहेत. जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली वाहतात.हा एक गंभीर प्रकार आहे. त्यांनी हे ट्विट मागे घ्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला. तर औरंग्याच्या पिलावळाकडून काय अपेक्षा करणार, हे हिरवे साप आहेत. राहुल गांधींनी देशाची, जनतेची आणि शिवभक्तांची माफी मागावी. अन्यथा त्यांना फिरकूही देणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला.
हर्षवर्धन सपकाळांकडून सारवासारवीचा प्रयत्न
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केली. राहुल गांधींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना काय म्हटलं, तर माय हंबल ट्रिब्युट. म्हणजे, मी त्यांना अभिवादन करतो, नमन करतो हा त्यांचा त्या मागचा भाव आहे.आता ध चा मा करून विरोधकांनी घाणेरडे राजकारण करू नये, असं सपकाळ म्हणाले.