शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ठाकरेंचा शह; नवी रणनिती पक्षातील गळती थांबवणार?

शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ठाकरेंचा शह; नवी रणनिती पक्षातील गळती थांबवणार?

Udhhav Thackeray UBT New Strategy for stop Shinde Operation Tiger : एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड करून सत्तापालट केलेल्या घटनेला अडीच वर्षांहून अधिक दिवस लोटले असले तरी देखील ठाकरे गटातील गळती थांबलेली नाही. नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ते सर्वजण शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. यावर आता ठाकरे गटाकडून नवी रणनिती आखली जात आहे. त्याातून या गळतीला थांबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘चार्जशीटमध्ये फेरफार…’, बीड हत्याप्रकरणाबाबत मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा सुरू झालेलं शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची सध्या चर्चा सुरू आहे. यावर ठाकरेंनी आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांवर विशेष जबाबदारी टाकली आहे. यासाठी आता प्रत्येक मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची सेना भवन येथे बैठक होईल. तसेच अनेक ठिकाणी सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांची जागी नावे व सैनिकांना संधी दिली जाईल. तसेच ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत. यावेळी ते तळागाळातील शिवसैनिकांचं म्हणणं आणि बाजू समजून घेणार आहेत.

बाप-लेकाची जोडी करणार धमाल, प्रसाद खांडेकर आणि श्लोक खांडेकर ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात एकत्र

तसेच ठाकरे गटाच्या 14 महत्त्वाच्या नेत्यांची दर आठवड्याला बैठक होणार आहे. यामध्ये सुभाष देसाई, दिवाकर रावते, अदित्य ठाकरे, अनंत गीते, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत, अंबादास दानवे राजन विचारे, सुनील प्रभू यांचा समावेश असणार आहे.

तसेच पक्षांमध्ये राहूनच पक्षाविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येते. दुसरीकडे मुंबईसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आले आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ठाकरे वाटायला पक्षातील गळती रोखून पक्ष संघटना मजबूत करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता ही रणनीती यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube