Udhav Thackeray On ED & CBI : ईडी, सीबीआय हे सरकारचे घरगडी आहेत, उद्या आमचं सरकार आल्यावर ईडी, सीबीआयचं काय करायचं ते ठरवलं असल्याचा थेट इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी दिला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांंमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच चिखलीमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह ईडी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनाही तंबी दिली आहे.
‘जयंत पाटील शेवटचा डाव आखणार..,’;’दिल्लीसुद्धा पवारांना घाबरते’ म्हणणाऱ्यांना विखेंचा मार्मिक टोला
उद्धव ठाकरे म्हणाले, 2019 साली भाजपचे नेते अमित शाह यांनी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत मला शब्द दिला होता. शिवसेना आणि भाजप दोघेही अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री राहणार आहे. हे मी माझ्यासाठी नाहीतर शिवसेनेसाठी मागत होतो. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा होता. तेव्हा पद आणि जबाबदाऱ्यांचं आपण समसमान वाटप करु, असं अमित शाहा यांनी सांगितलं होतं. मात्र, अमित शाह यांनी शब्द मोडला. त्यामुळेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलो होतो, त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपने केलेला वचनभंग असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव, जरांगेंचा पलटवार
आता भाजपच्या नेत्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमच्या नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. एवढं घाबरुन आमच्या खासदार आमदारांवर का कारवाई करत आहात? ईडी आणि सीबीआयचे अधिकारी तुमचे घरगडी आहेत काय? घरगड्यांनाही सांगतो, तुम्ही आत्ता त्यांचे घरगडी असाल पण उद्या आमचं सरकार येतंय. आमचं सरकार आल्यावर ईडी सीबीआयचं काय करायचं ते ठरवलंय, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना तंबीच दिली आहे.
नाशिक : पोलीस निरीक्षकांची स्टेशनमध्येच आत्महत्या; सर्विस रिवॉल्वरमधून डोक्यात झाडली गोळी
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर यांच्या घरी ईडीने छापेमारी करुन त्यांच्यावर कारवाई केल्याचं पाहायला मिळालं होतं. तर कथित कोविड खिचडी घोटाळ्या प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली असून संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांचीही चौकशी करण्यात आली. एकूण या संपूर्ण कारवायांवरुन आज उद्धव ठाकरे यांनी ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं आहे.