‘शेपूटघाल्या गृहमंत्री माझ्यावर फणा काढतोयं’; उद्धव ठाकरेंची शाहांवर जळजळीत टीका

Udhav Thackeray On Amit Shah : शेपूटघाल्या गृहमंत्री माझ्यावर फणा काढतोयं, अशी जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर केली आहे. दरम्यान, मंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याचं दिसून आलं होतं. […]

'शेपूटघाल्या गृहमंत्री माझ्यावर फणा काढतोयं'; उद्धव ठाकरेंची शाहांवर जळजळीत टीका

Udhav Thackeray On Amit Shah : शेपूटघाल्या गृहमंत्री माझ्यावर फणा काढतोयं, अशी जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर केली आहे. दरम्यान, मंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याचं दिसून आलं होतं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी औसाच्या सभेत प्रत्युत्तर दिलं आहे.

दोन आमदारांचा नकार, गडकरींविरोधात काँग्रेसला उमेदवारच नाही; नागपुरातील ‘गणित’ अवघड

उद्धव ठाकरे म्हणाले, काल परवा अमित शाह इकडे आले होते. तिकडं मणिपूर पेटलंय तिकडं जायची त्यांची हिंमत नाही. तिकडं शेपूट घालतात अन् इकडं हा नागोबा फणा काढतोय. काश्मीरात, अरुणाचल प्रदेशात जायची हिंमत नाही तिकडं शेपूट घालतात, अन् शेपुटघाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन फणा काढून गेला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

तसेच आता तर अमित शाहांनी एक नवीन शोध लावला आहे. महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा असं ते म्हणताहेत तर ठीक आहे पण तुमच्या महायुतीला भ्रष्टाचाराची चाकं लागलेली आहेत, सर्वच भ्रष्टाचारी लोकं तुम्ही महायुतीत भरलेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

सनी लिओनीलाही ‘नवरोबा’ची भुरळ, कन्नी सिनेमातल्या गाण्यावरचा भन्नाट डान्स पाहा

काय म्हणाले होते अमित शाह?
मागील 40 वर्षांत इंडिया आघाडीची देशात सत्ता होती. त्यानंतर आता मागील 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता देशात आली आहे. आम्ही इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चेसाठी तयार आहोत. त्यांनी आम्हाला त्यांचा मागील 40 वर्षांतील विकासकामांचा हिशोब मांडावा, आम्हीदेखील आमच्या गेल्या 10 वर्षांतील विकासकामांचा हिशोब मांडणार आहोत. पण इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये हिशोब मांडण्याची हिंमत नसल्याची टीका अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांच्यावर केली होती.

दरम्यान, भाजपने आमदार, खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल असं त्यांना वाटलं पण शिवेसना भाजपला मातीत गाडून पुढे जाईल. ज्यावेळी मोदी नाव कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो. बाळासाहेब होते म्हणूनच मोदी दिसत आहेत. आम्हाला मोदींचं कौतूक काय सांगता कट्टर शिवसैनिक आम्हाला पुरेसे आहेत. अटल वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या डब्यात टाकायला निघाले तेव्हा बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदी दिसलेच नसते, अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. तसेच राज्यात मोदींचं नाव चालूच शकत नाही म्हणूनच ते आता बाळासाहेबांचे फोटो लावताहेत. स्वत:च्या बापाचे फोटो लावून मते मागा ना. स्वत:च्या बापावर तुम्हाला विश्वास नाही का? असा रोखठोक सवालही उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना केला आहे.

Exit mobile version