Udhav Thackeray On Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) मी दुश्मन मानत नाही, ते मानत असतील, ते शिवसेना तोडत आहेत, तरीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, या शब्दांत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उद्या 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरेंनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत आयोजित पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘दशावतार’ ची बॉक्स ऑफिसवर विजयी घौडदौड! 5 कोटी 22 लाख कमाई अन् शोज हाऊसफुल्ल
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे दुश्मन नाहीत. ते मला मानत असतील पण मी त्यांना दुश्मन मानत नाही. हे राजकारण आहे, ते शिवसेना तोडत आहेत ते कोणीही सहन करु शकत नाही. त्यांच्या मनात पाप असेल तरीही मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलंय.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेना पक्षाबाबत घेत असलेली भूमिका मला मान्य नाही. मोदी शिवसेना तोडायला संपवायला निघाले आहेत. ते कोणालाही सहन होणार नाही. तरीही त्यांनी देशाचा कारभार चांगला करावा, अशा मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, असं उद्धव ठाकेरंनी स्पष्ट केलंय.
पु्ण्यात तुफान पाऊस! घरे अन् वाहने पाण्याखाली, शाळांना सुट्टी जाहीर; सतर्कतेचे आवाहन
भूतकाळातली भूतं भाजपच्य मानगुटीवर बसलेत…
भाजपकडून भूतकाळात अनेक गोष्टींची घोषणा केलेली होती. यामध्ये अच्छे दिन, स्मार्ट सिटी, शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा अनेक घोषणा केल्या होत्या. आता याच घोषणांची भूतं भाजपच्या मानगुटीवर बसले आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसान डोळ्यासमोर आहे. तत्काळ मदत केली पाहिजेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे कोण करणार देवाभाऊ? तातडीने मदत करण्याची मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केलीयं.
समस्यांचं रुपांतर संधीत करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असायला हवं; मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत माध्यमांकडून सवाल करण्यात आला.त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, गणपतीला मी राज ठाकरेंकडे गेलो. राज ठाकरेही माझ्या वाढदिवसाला आला होता. मी गेलो तरी अडचण नाही गेलो तरी अडचण नेमकी अडचण काय? मावशी बोलली असंच येत रहा त्यामुळे गेलो भेटायल, असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या भेटीवर दिलंय.