Ujjwal Nikam On Santosh Deshmukh murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझ्या नियुक्तीकरिता मस्साजोगचे ग्रामस्थ मागणी करत होते. त्यानंतर त्यांनी नियुक्तीकरिता कालपासून अन्नत्याग ( Santosh Deshmukh murder) आंदोलन सुरू केलेलं आहे. हे ऐकून मी व्यथित झालो होतो. त्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात काल कळवलं.
Video : पुणे हादरलं! गजबजलेल्या स्वारगेट आगारात 26 वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार
सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे. त्यांनी त्याप्रमाणे खटला चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश पारित केल्याचं आज मला समजलं आहे. अर्थात मी याकरिता मु्ख्यमंत्र्यांचा आभारी आहे. तसंच मस्साजोगच्या (Beed) ग्रामस्थांनी उपोषण सोडावं असं आवाहन देखील ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी केलंय. ते म्हणाले की, याला कारण असं आहे की या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे. आपल्या प्रकृतीला त्रास होईल, असं कृत्य करू नये. त्यामुळे आपण उपोषण सोडावं असं ते मस्साजोगचे ग्रामस्थ यांना उद्देशून म्हणाले आहेत.
अरे बापरे! दर मिनिटाला एका महिलेचा कॅन्सरने मृत्यू, WHO चा धक्कादायक अहवाल
उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय की, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तातडीने खटला चालविण्यास घेऊ. माझ्या नियुक्तीचे राजकीय पडसाद उमटतील, अशी कल्पना होती. मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलं होतं. त्यांनी सांगितलंय की, विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात सक्रीय होते अजूनही आहेत. निकम म्हणाले की, मी राजकारणात याआधी कधीही सक्रिय नव्हतो. मी अभिमानाने सांगेल की, राजकारणात असलो तरी माझ्या कर्तव्यात कोणीही आडवं येऊ शकत नाही. त्याच जोमाने मी खटला चालवणार आहे. विरोधकांच्या गाऱ्हाण्याला मी काहीही महत्त्व देत नाही. नुसता विरोधासाठी विरोध करणं, हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे, अशी टीका उज्ज्वल निकम यांनी केलीय.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.