पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही; राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांची स्पष्ट भूमिका

Umesh Patil-गेले तीन दिवस पार्थदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार या दिल्लीत बैठकीला आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बैठका घेत आहेत.

Umesh Patil On NCP Leader Dispute

Umesh Patil On NCP Leader Dispute

Umesh Patil On NCP Leader Dispute: राष्ट्रवादीमध्ये पटेल-तटकरे आणि त्यांच्या फळीतील नेते विरूद्ध पार्थ पवार असा संघर्ष असल्याच्या अनेक गोष्टी वारंवार समोर येतोय. त्यात आता तर थेट मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) एका टेंडरवरून थेट पार्थ पवारांना (Parth Pawar) खडेबोल सुनावल्याचं एका बैठकीमध्ये घडलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये सुरू असलेली धुसफुस थेट वादामध्ये रूपांतरित झाली असल्याचे बोलले जात आहे. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

मंत्री छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्याबाबत योग्य तो खुलासा केला आहे. ज्या बातम्या येत आहेत त्या सुत्रांच्या हवाले येत आहेत. एकतर्फी आणि नकारात्मक बातम्या पार्थ पवार किंवा पक्षाबद्दल दिल्या जात आहेत. मात्र दुसरी बाजू माध्यमांनी समजून घेतली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी माध्यमांसमोर दिल्ली येथे मांडली.

Vidhan Parishad Election 2026 : आघाडीचे जागावाटप जाहीर; काँग्रेसला सर्वाधिक जागा, पुणे, ठाणे पवारांकडे, ठाकरेंना कोणत्या जागा ?

गेले तीन दिवस पार्थदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार या दिल्लीत बैठकीला आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बैठका घेत आहेत. मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसताना बातमी आली आहे असेही उमेश पाटील म्हणाले. प्रत्येक बातमी तुमची सुत्रांकडून येत आहे. कोणतीही पुराव्याची बातमी लावलेली नाही. त्यामुळे सुत्रांकडून आलेल्या बातम्या तुम्ही लावाव्या का असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Liquor Poisoning : पुण्यात विषारी दारूने मृत्युचं तांडव; मेथनॉल शरीरात गेल्यावर नेमकं काय होतं?

पार्थ पवार यांच्याकडे नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत त्यामुळे त्यांना त्या नवीन आहेत. सुत्रांच्या हवाले बातम्या येणे योग्य नाही. आम्हाला कोण टार्गेट करतंय असं आम्हाला वाटत नाही. मात्र खात्री किंवा पुरावा असल्याशिवाय बातम्या लावणं चुकीचं आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

Exit mobile version