Download App

एकनाथ शिंदे मराठ्यांचे नेते झालेत : प्रकाश आंबेडकरांचं प्रमाणपत्र

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आलं. सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यात. तसा अध्यादेशही काढला. त्यानंतर शनिवारी (२७ जानेवारी) मराठा आंदोलक नवी मुंबईतून परतले. मनोज जरांगे पाटील हेही जालन्यातील अंतरवली सराटीत पोहोचले. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता वंचित बुहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडक (Prakash Ambedkar) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे मराठ्यांचे नेते झालेत, असं ते म्हणाले.

Bihar Politics : नितीश कुमार नवव्यांदा बिहारचे CM; भाजपाच्या तिघांनी घेतली शपथ 

मराठा समाजाला ओबीसी सवलती दिल्याचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होणार आहे. या निर्णयामुळं ओबीसीला जवळ घेणाऱ्या भाजपचं नुकसान होईल, असं आंबेडकर म्हणाले.

आज प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाविषयी विचारले असता ते म्हणाले की, जरांगे पाटलांचं आंदोलन स्थगित झालं. त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं नाही. जे नेते स्वत:ला मराठा समजाचे पुढारी समजत होते, ते सर्व मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेल्या निर्णयामुळं क्लीनबोल्ट झाले. एकनाथ शिंदे हे सर्वांना वरचढ ठरले. धाडशी माणूस म्हणून शिंदेंविषयी बोलल्या जातं. त्यांनी घेतलेल्या कालच्या निर्णयाने ते मराठा समाजाचे नेते ठरले. झोपलेल्या मराठा नेत्यांविषयी मराठा समाजाच्या मनात चीड आहे. तर शिंदेविषयी सहानुभूती वाढली आहे, असं आंबेडकर म्हणाले.

Chhagan Bhujbal : ‘सरकारकडून आता हट्ट पुरवण्याचे काम सुरू’; भुजबळांची स्पष्ट शब्दांत नाराजी 

भाजपचं मोठं नुकसानं
या निर्णयामळं दरी मिटण्यापेक्षा दरी वाढली आहे. ओबीसी जे नेते आहेत, ते अधिक जोराने आणि जोमाने या निर्ययाच्या विरोधात जातील. या खेळात नुकसान झालं ते बीजेपीचं झालं. कालच्या निर्यमायने पूर्ण ओबीसी नाराज झालेत. त्यामुळं ओबीसी आपल्याकडे खेचण्याचा जो भाजपचा डाव होता तो फसला. त्यामुळं ओबीसी बीजेपीलाही सोडणार नाहीत. मराठा समाज एकनाथ शिंदेंकडेच आहे. बीजेपीकडे त्यांनी पाठ फिरवली, असंही आंबेडकर म्हणाले.

जरांगेंच्या सभेतून एक जाणवले की ते वंचितबद्दल सकारात्मक बोलत होते. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे, असाही त्यांचा सूर होता, असं आंबेडकर म्हणाले.

काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज
लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे 42 उमेदवार ठरले आहेत. महाविकास आघाडीने सोबत घेतलं तर त्यांच्यासोबत लढू, अन्यथा स्वतंत्र लाढू, असा इशाराही आंबेडरांनी दिला. इंडिया आघाडीचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. ममता, आप वेगवेगळ्या भूमिका करत आहेत. सपा आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे, त्यामुळं आता काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावाला.

follow us