Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा कथित फोटो काँग्रेसकडून(Congress) एक्सवर शेअर करण्यात आला आहे. बावनकुळे यांचा हा कथित फोटो समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भाजपसह चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार टीका केली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे.
दिवाळी स्पर्धा!
एका पत्याच्या pack मध्ये किती पत्ते असतात?
अचूक उत्तर देणार्यांना Macau trip भेट. pic.twitter.com/OL4yvNrEg3— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 20, 2023
महाराष्ट्र काँग्रेसने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “दिवाळी स्पर्धा! एका पत्याच्या pack मध्ये किती पत्ते असतात? अचूक उत्तर देणार्यांना Macau trip भेट.” या कॅप्शनसह चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनो खेळतानाचा कथित फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन विरोधकांनी बावनकुळेंवर एकच हल्लाबोल चढवला आहे.
Mumbai Crime : चक्क सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; कुर्ला परिसरातील धक्कादायक घटना
जुगार खेळण्यासाठी पैसे आले कुठून?
महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे पण सत्ताधारी भाजपाला त्याचे काहीही देणेघेणे नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचे फोटो मीडिया व सोशल मीडियात दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे जुगार खेळत असल्याचा फोटो ट्वीट केला आहे, हा फोटो खरा आहे का? बावनकुळे जुगार खेळत होते का? आणि जुगार खेळण्यासाठी बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कोठून? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी का घेतली ? टीम इंडियाच्या धोक्याचं कारण कमिन्सने सांगितलं
झाला तेवढा तमाशा पुरेसा : राऊत
19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? ते म्हणतात फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांचा जुगार खेळतानाचा कथित फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपकडू प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे कधीच जुगार खेळत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.