Pariwartan Mahashakti : आगामी विधानसभेच्या (Vidhansabha Election) दृष्टीने राज्यात रोज नवीन समीकरणं तयार होत आहेत. अशातच राज्यात तिसरी आघाडी (Third front) स्थापन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje), राजू शेट्टी, बच्चू कडू (Bachchu Kadu), शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी एकत्रितपणे तिसऱ्या आघाडीची घोषणा केली. परिवर्तन महाशक्ती (Pariwartan Mahashakti) असं या तिसऱ्या आघाडीचं नाव आहे.
पुण्यात आज तिसऱ्या आघाडीसंदर्भात संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, आणि बच्चू कडू यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तिसरा पर्याय देण्याविषयी चर्चा कऱण्यात आली. या बैठकीनंतर व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ‘परिवर्तन महाशक्ती’ची घोषणा करण्यात आली. यावेळी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे म्हटले की, महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झालेली असून त्यांना सक्षम व सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील सध्याचे राजकारण पाहता, पुर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटले जायचे तशीच शिवसेना व राष्ट्रवादीची अवस्था झालेली आहे.
Shreya Chaudhary: ‘द मेहता बॉईज’च्या शिकागो प्रीमियरबद्दल अभिमान’, अभिनेत्रीने स्पष्ट सांगितलं
यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर यांच्यासह सर्व पक्षांचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
तर राजू शेट्टी म्हटले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा सातबारा कोणत्याही पक्षाच्या नावावर केलेला नाही, ‘परिवर्तन महाशक्ती’चे नेतृत्व सामूहिक असेल, असं ते म्हणाले.
तर बच्चू कडू म्हणाले की, आमच्या जवळ विचारांचा व मुद्द्यांचा अजेंडा आहे, ज्या पक्षांना व संघटनांना आमच्या परिवर्तन महाशक्तीमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांच्यासाठी आमचे दालन उघडे असेल, असं ते म्हणाले.
स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवला तर…; आदित्य ठाकरेंचे सीएम शिंदेंवर टीकास्त्र
शंकरअण्णा धोंडगे म्हटले की, महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा लक्षात घेता, प्रस्थापित आघाड्यांना एक आश्वासक पर्याय देण्याचा निर्णय व निश्चय आजच्या बैठकीत झाला. ही तिसरी आघाडी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चांगले काम करून दाखवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२६ सप्टेंबरला परिवर्तन महाशक्तीचा मेळावा…
स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप यांनी सांगितले की, येत्या २६ सप्टेंबर रोजी परिवर्तन महाशक्तीच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच परिवर्तन महाशक्तीमध्ये विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे.
दरम्यान, तिसऱ्या आघाडीमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती अन् मविआची समीकरणं बदलतील का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.