Vijay Wadettiwar : दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारला रेटकार्ड पाठवले. यावरून आता काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला या प्रकाराचा जाब विचारत घणाघाती टीका केली. कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे याचे भान सरकारला नाही. आमदारांना खोके दिले जातात पण शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
किडनी – ७५,०००/ १० नग
लिव्हर – ९०,०००/ १० नग
डोळे – २५,०००/ १० नगयासह शरीरातील इतर अवयवांचे रेट कार्ड काढून दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी ते सरकारकडे पाठवले आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे आणि त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 23, 2023
वडेट्टीवार यांनी एक ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, किडनी-75000/10 नग, लिव्हर-90000/10 नग, डोळे-25000/नग. यांसह शरीरातील इतर अवयवांचे रेट कार्ड काढून दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी ते सराकरकडे पाठवले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे आणि त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे ह्याचे भान महायुती सरकारला नाही. हेच शेतकरी जर आमदार खासदार असते तर त्यांच्यासाठी खोके देण्याची तयारी या सरकारने त्वरित दाखवली असती. पण, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नाही. शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे अशी खरमरीत टीका वडेट्टीवार यांनी या ट्विटद्वारे केली आहे.
कर्जबाजारी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ; शासनाला दरपत्रकच पाठवलं
नेमकं प्रकरण काय ?
यंदाच्या मान्सूनमध्ये(Mansoon) काही भागांत जास्त तर काही भागांत पावसाने पाठ फिरवल्याने म्हणावं तशी पिके आली नसल्याची परिस्थिती आहे. जे पीक आले आहेत, त्या पिकांच्या पैशांतून घेतलेलं पीक कर्जसुद्धा फेडणं शक्य नसल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी(Farmer) मोठं पाऊल उचललं आहे. हिंगोली जिल्ह्यातील 10 कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला काढले आहेत. अवयवाच्या दराबाबत एक पत्रचं शेतकऱ्यांनी सरकारला धाडलं आहे. आमचे अवयव विकत घेण्याची मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केली आहे.
हिंगोलीतल्या सेनगावमधील माझोड, केंद्रा बुद्रूक, ताकतोडा गावातील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीसाठी काढले आहेत. यामध्ये शेतकरी गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, गजानन जाधव, धिरज मापारी, नामदेव पतंगे, यांनी अवयव विकण्यासाठीचं दरपत्रक शासनाकडे निवेदनाद्वारे पाठवलं आहे. शेतकऱ्यांनी पाठवलेल्या दरपत्रकामध्ये किडनीचा दर 75 हजार, लिव्हर 90 हजार, डोळे 25 हजार रुपये असा दर शेतकऱ्यांनी शासनाकडे दिला आहे.
Aditya Thackeray : ठाकरेंचं मिशन कोकण! ‘खळा’ बैठकांतून साधणार निवडणुकांचे लक्ष्य?