Worli Hit And Run Case Sanjay Raut Question Marathi Film Industry : पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच वरळीत (Worli Hit And Run Case) रविवारी (7 जुलै) पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते जयवंत वाडकर यांच्या सख्ख्या पुतणीने या अपघातात आपले प्राण गमावले. मात्र यावर अद्याप मराठी चित्रपट सृष्टीतून (Marathi Film Industry) कोणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता मराठी फिल्म इंडस्ट्री गप्प का? हे कसलं मराठीपण असं म्हणत कलाकारांना सवाल केला आहे.
Bardovi : अभिनेत्री छाया कदम यांचं आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण; आगामी सिनेमाचं हटके पोस्टर रिलीज
यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, गुन्हेगारांना प्रोटेक्शन द्यायचं आणि आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं. वरळी हिट अँड रन केसमध्ये नेमकं तेच झालं आहे. ज्या प्रकारे महिलेला रस्त्यावर आणून वारंवार चिरडण्याचा प्रकार झाला. हा एखादा नराधम, नशा आणि पैशाची मस्ती असणाराच हे करू शकतो. एका मराठी महिलेची रस्त्यावर ज्या प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली आणि मुंबई पोलिसांना आरोपी तीन दिवस सापडत नाही हे कोणाला खरं वाटेल का?
Video: थरकाप उडवणारा भीषण अपघात! स्लीपर बस अन् टँकरची धडक; 18 जणांचा जागीच मृत्यू
त्याच्या शरीरातील नशेचा अंश हा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये. यासाठी त्याला तीन दिवस त्याला फरार ठेवण्यात आलं आणि आता त्यांना आणण्यात आलं आहे. हे संपूर्ण कुटुंब गुन्हेगार आहे. फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालला पाहिजे. त्याचबरोबर हे कुटुंब मराठी अभिनेते जयंत वाडकर यांचे नातेवाईक आहेत. आता कुठे गेली मरठी फिल्म इंडस्ट्री? एरवी आपण कॉमेंट देत असता, आता का टाळकुटेपणा करता? मराठी फिल्म इंडस्ट्री आता का मूग गिळून गप्प बसतात? कसलं मराठीपण आहे तुमच्यामध्ये? असं म्हणत संजय राऊत यांनी कलाकारांना सवाल केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
वरळीत रविवारी (7 जुलै) पहाटे 5:30 वाजता एक कोळी दाम्पत्य मासे आणण्यासाठी बाहेर पडलं होतं. त्यावेळी वरळीतील अॅट्रीया मॉल जवळ त्यांना मासे घेऊन परतत असताना एका फोरव्हिलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेमुळं ते दोघेही कारच्या बोनटवर पडले. वेळीच नवऱ्याने बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला बाजूला होता आलं नाही. तर अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडी पळवली. त्यात कोळी महिलेला त्याने फरफटत नेले. यात त्या महिलेचा मृत्यू झाला. कावेरी नाखवा असं या मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. ती मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते जयवंत वाडकर यांची पुतणी आहे.
या अपघातात कार चालक पळून गेला होता. कावेरी नाखवा यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी वरळी पोलिसांनी तपासादरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा आणि राजेंद्रसिंह बिदावत यांना अटक केली आहे. राजेश शाह हे आरोपी मिहिर शाहचे वडील आहेत. मिहीर हा अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.