मी बारामती लोकसभा मतदारसंघात इतिहास घडवेल, विजय शिवतारेंनी स्वीकारलं आव्हान

घातपात न करता उघड्या छातीने या, मग तुम्हाला दाखवतो विजय शिवतारे कोण ते, तुम्ही जर असं वागणार असाल तर मी बारामती मध्ये इतिहास घडवून दाखवेल, लोक इतिहास घडवतील. तुम्हालाही एकच मत आहे. त्यामुळे बारामती मधील लोक महत्वाचे आहेत. असं आव्हान विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना दिल आहे. काल पुण्यात एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी […]

Vijay Shivtare

Vijay Shivtare

घातपात न करता उघड्या छातीने या, मग तुम्हाला दाखवतो विजय शिवतारे कोण ते, तुम्ही जर असं वागणार असाल तर मी बारामती मध्ये इतिहास घडवून दाखवेल, लोक इतिहास घडवतील. तुम्हालाही एकच मत आहे. त्यामुळे बारामती मधील लोक महत्वाचे आहेत. असं आव्हान विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना दिल आहे.

काल पुण्यात एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये जास्त माज केला तर तो आम्ही उतरून टाकू, असं आव्हान दिल होत त्याला उत्तर देताना विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने खळबळ

शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चांदेरेंवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती विभागीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर चांदेरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.

बारामती मतदारसंघात सतत सत्ता असूनही तुम्ही मतदारसंघातील लोकांची फसवणूक केली आहे. बारामती शिवाय इतर पाच विधानसभा मतदारसंघाची फसवणूक केली आहे. आजही अनेक भागात पाण्याचे प्रश्न आहेत आणि माज मोडण्याऐवजी तुम्ही निवडून आणून दाखवा. इतकं होत तर तुम्ही तुमच्या मुलाला का निवडून आणू शकला नाही. अशी बोचरी टीका शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.

बारामतीमध्ये आजही अनेक ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहेत. पश्चिम बारामतीमधील अनेक गावात आजही पाण्याचे प्रश्न आहे. ते त्यांना इतक्या वर्षात सोडवता आले नाहीत. अशी टीका त्यांनी यावेळी केली.

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल

Exit mobile version