VIDEO : उंटावरून शेळ्या हाकू नको; आमदार महेश लांडगेंचे अजितदादांना जोरदार प्रत्युत्तर

Mahesh Landge: मी या शहरामध्ये राहतो आहे. मी नागरीक आहे या शहराचा. मी लोकप्रतिनिधी नंतर आहे. माझ्या शहराचा व माझा स्वाभिमान दुखवू नये.

Mahesh Landge On Ajit Pawar Pcmc

Mahesh Landge On Ajit Pawar Pcmc

Mahesh Landge On Ajit Pawar: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Election) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) जोरदार संघर्ष उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर सभा, पत्रकार परिषदेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय. त्यावरून आता भाजपकडून अजित पवार यांना लक्ष्य केले जात आहे. आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. माझ्या शहराची बदनामी त्यांनी करू नये, असे सांगत आमदार महेश लांडगे यांनी थेट उंटावरून शेळ्या हाकू नये, अशी भाषाही वापरली आहे.

पुनावळ्यात भाजपच्या जुन्या–नव्यांचा ऐतिहासिक मेळ; स्थानिक पातळीवर उमेदवारांचे बळ वाढवणाऱ्या प्रचाराची सुरुवात

भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी लेट्सअप चर्चामध्ये अजितदादांना प्रत्युत्तर दिले आहे. महेश लांडगे म्हणाले, महायुतीच्या घटक पक्षामधील उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख जबाबदार नेते आहेत. ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घातले पाहिजे. त्यांनी सूचना केल्या पाहिजे. प्रशासनाने सूचना स्वीकारल्या पाहिजे. पण मी पिंपरी चिंचवड शहर हा माझा स्वाभिमान आहे. माझा स्वाभिमान कुणी दुखावला, तर मी सहन करणार नाही. या पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक समाजातील घटक माझा स्वाभिमान आहे. त्याला कुणी ठेच लावायची नाही. तुम्ही सूचना करा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. तुम्ही अजून शहरासाठी चांगले काय करायचे ते मांडा. ते मांडत असताना आमच्या पक्षाची व आमच्या शहराची बदनामी होईल, असे विधान करू नये, असा सल्ला लांडगे यांनी दिलाय.


अंबरनाथमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी; काँग्रेसच्या तब्बल 12 नगरसेवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश

मी या शहरामध्ये राहतो आहे. मी नागरीक आहे या शहराचा. मी लोकप्रतिनिधीनंतर आहे. आता पाण्यात राहून मासा झोपतो कसा हे पाण्यातील माशाला माहीत आहे ना ? या शहरात आम्ही कसो राहतो हे आम्हालाच माहिती आहे. पाण्याच्या बाहेर राहून पाण्यातील मासा झोपतो कसा सांगावे लागते का ? त्यासाठी या शहरात राहावे लागते. नागरिकांचा सुख-दुखा:त जावे लागते. चर्चा करून अडचणी सोडाव्यावा लागतात. माझे आजोबा व वडिलांनी सांगितले आहे, उंटावरून कधी शेळ्या हाकू नये, असे लांडगे म्हणाले.


तेव्हा मी चांगला होतो, आता-महेश लांडगे

निवडणूक आल्यानंतर आरोप करणे. जेव्हा लोकसभेला युती म्हणून घड्याळाचे काम केले तेव्हा मी चांगला होतो. असं काय झालं, महानगरपालिका निवडणूक आल्यानंतर मी का असं दिसायला लागलो. लोकं हुशार आहेत. आपलं कोण, आपलं जवळचा आणि लांबच कोण हे लोकांना कळतं. व्यथा मांडणारा, दुखतः येणारा माणूस कोण हे कळतं. आपल्या कुटुंबातील महिलांच्या संरक्षणाचा विचार करणारा माणूस कोण आहे ? हे लोकं ओळखतात, असे महेश लांडगे म्हणाले.

Exit mobile version