Nana Kate : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजितदादा पालकमंत्री होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचं म्हणत पुन्हा एकदा नाना काटे(Nana Kate) यांनी महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. यावेळी नाना काटेंचा रोख नेमका कोणावर होता? हे स्पष्ट होऊ शकलं नाही पण भाजपवर त्यांचा रोख असल्याचं दिसून आलं आहे.
Fighter: हृतिक अन् सिद्धार्थचा ‘फायटर’ ची एक खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला
अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष भाजपवर निशाणा साधला आहे. दादा पालकमंत्री झाल्यानं जनतेसह राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा होईल तर चुकीचं काम करणाऱ्यांचा मात्र तोटा होईल, असा अजितदादा गटाला विश्वास आहे.
Amitabh Bachchan: बॉलीवूडचे बिग बी यांच्याविरोधात तक्रार दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?
नाना काटे म्हणाले, अजित दादा पालकमंत्री झाल्यापासून ज्यांनी चुकीचे काम केली आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत, सोबतच चैतन्याचं वातावरण तयार झालं आहे. मागील पाच ते सात वर्षांत ज्यां लोकांनी चुकीचे कामे केलीत त्यांचे धाबे आता दणाणणार आहेत. त्यामुळे आता दादा पालकमंत्री झाल्याने ज्यांना चांगली कामे करायची आहेत त्यांना दादा प्रोत्साहन देणार असल्याचंही नाना काटे म्हणाले आहेत.
Nobel Prize 2023 : रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन शास्त्रज्ञांना मिळाला पुरस्कार
तसेच आता कोणाचं नाव घेण्याचं कारण नाही पण ज्यांनी चुकीची कामे केली आहेत, त्यांना अजित पवार पालकमंत्री झाल्याने चपराक बसली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अजिदादा पालकमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Pune News : ड्रग्स तस्करीतला आरोपी पळून जाणं पोलिसांना भोवलं; निलंबनाची कारवाई…
दादांचा राष्ट्रवादीच्या माध्यमातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यांच्या कामाचा ओघ पाहिला तर त्याची प्रचिती जिल्ह्याला आहे, त्यामुळे नक्कीच चुकीचे कामे करणाऱ्यांना त्याचा तोटा होणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
शाकाहारी टेबलावर मांसाहार; IIT मुंबईमध्ये विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड
भाजपविरोधात आवाज उठवला :
काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने भाजपच्या विरोधात आवाज उठवला होता. नाना काटे यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आता नाना काटे यांनी फिरकी घेतल्याचं दिसून येत आहे. त्यावेळी त्यांनी केलेले आरोप सिद्ध झाल्याचं त्याचा फायदा आम्हाला होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.