Nobel Prize 2023 : रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन शास्त्रज्ञांना मिळाला पुरस्कार
Nobel Prize 2023 : रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा रॉयल स्वीडीश अकॅडमी ऑफ सायन्सकडून करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मौंगी जी, बावेंडी, लुईस ई, ब्रुस आणि एलॅक्सी आई यांना घोषित करण्यात आला आहे. क्वांटम डॉट्सच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने बुधवारी यासंदर्भात घोषणा केली आहे.
BREAKING NEWS
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2023 #NobelPrize in Chemistry to Moungi G. Bawendi, Louis E. Brus and Alexei I. Ekimov “for the discovery and synthesis of quantum dots.” pic.twitter.com/qJCXc72Dj8— The Nobel Prize (@NobelPrize) October 4, 2023
क्वांटम डॉट्सच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने बुधवारी यासंदर्भात घोषणा केली आहे. यासोबतच कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. सोमवारीच फिजिओलॉजी किंवा मेडिसिन क्षेत्रासाठी या सन्मान विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली होती.
गिधड धमक्या, ठाकरेंना इशारा! नार्वेकरांनी सांगितलं अपात्र आमदारांच्या निकालाचं प्लॅनिंग
वर्षी कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला. न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला असून या शोधामुळे कोरोना व्हायरस म्हणजेच COVID-19 विरुद्ध प्रभावी mRNA लस विकसित करण्यात मदत झाली.
Raigad : स्थगिती उठली, निधीही मंजूर, कामे मार्गी : आदिती तटकरेंची मतदारसंघात जोरदार बॅटिंग
मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. या श्रेणीसाठी 2023 चा नोबेल पुरस्कार संयुक्तपणे पियरे ऑगस्टिनी, फेरेंक क्रॉझ आणि अॅन ल’हुलियर यांना जाहीर करण्यात करण्यात आला. इलेक्ट्रॉन्सवरील अभ्यासासाठी हा सन्मान देण्यात आला. हा पुरस्कार प्रायोगिक पद्धतींसाठी देण्यात आला, ज्यामध्ये पदार्थातील इलेक्ट्रॉनच्या गतिशीलतेचा अभ्यास करण्यासाठी प्रकाशाच्या अॅटोसेकंद स्पंदनांची निर्मिती करण्यात आली.
दरम्यान, 2022 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या कॅरोलिन बर्टोझी, कोपनहेगन (डेनमार्क) विद्यापीठाचे मॉर्टन मिल्डाहल आणि स्क्रिप्स रिसर्च सेंटर, अमेरिकेचे के. बॅरी शार्पलेस यांना दिले होते. क्लिक केमिस्ट्री आणि बायोर्थोगोनल केमिस्ट्रीच्या विकासासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता.