Pune News : ड्रग्स तस्करीतला आरोपी पळून जाणं पोलिसांना भोवलं; निलंबनाची कारवाई…
ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी पळून गेल्याप्रकरणी पोलिस आयुक्त अॅक्शन मोडमध्ये उतरले आहेत. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 4 कर्मचारी आणि महिला अधिकाऱ्यासह 5 जणांचे निलंबन करण्यात आलं आहे. ससून रुग्णालयात आरोपी ललित पाटील उपचार घेत होता. याचदरम्यान आरोपीने पोलिसांना चकमा देत पळून गेला होता. त्यानंतर आज पोलिस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
सरकार दरबारी प्रश्न मांडण्यासाठी तोबा गर्दी; मंत्रालय ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मोठी रांग…
निलंबित केलेले अधिकारी आणि कर्मचारी :
PSI जनार्दन काळे, PC विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे, दिगंबर चंदनशिव, PSI मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, नाईक नाथाराम काळे, शिपाई पिरप्पा बनसोडे, शिपाई आमित जाधव
Nanded Civil Hospital Death : खुनी सरकार म्हणत सुप्रिया सुळे, वडेट्टीवारांनी शिंदे सरकारला घेरले
अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ललित पाटील याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. यानंतर त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये तो उपचार घेत होता.
‘आम्हाला डिवचल्यास गप्प बसणार नाही’; जरांगेंचा भुजबळांना कडक इशारा
मात्र, येथे उपचार घेत असतानाही तो काही जणांच्या मदतीने मेफेड्रॉन अमली पदार्थाची विक्री करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांन रुग्णालयाच्याच परिसरातून दोघा जणांना ताब्यातही घेतले होते. त्यांच्याकडून तब्बल दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते.
पीकविमा योजनेचे 406 कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरीत, शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी मिळणार
दरम्यान, पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या परिसरातून दोन कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. या रुग्णालयात रोज हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक राज्यातील विविध ठिकाणांहून येत असतात. त्यामुळे दवाखान्यात कायमच वर्दळ असते. दवाखान्याच्या प्रवेशद्वारावर कोट्यावधींचे ड्रग्ज सापडते म्हटल्यानंतर प्रकरण गंभीर आहे.
ससून रुग्णालयाच्या गेटजवळ दोन कोटींचे ड्रग्ज पकडण्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आणखी एक खळबळजनक घटना घडली. शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारीच ही घटना घडली. ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली होती.
ललित पाटील याला एक्स रे काढण्यासाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांना चकमा देत तेथून पळ काढला. रुग्णालयात पोलीस बंदोबस्त असतानाही आरोपी पळून गेलाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली होती.