Download App

शरद पवारांच्या वळसेंवरील टिकेला अजितदादा मतदारसंघात येऊन देणार उत्तर !

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar public meeting Manchar : पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे एकमेंकांना थेट आव्हाने देत आहेत. आता बारामती लोकसभा मतदारसंघात थेट सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा आखाडा रंगणार आहे. तर शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये काकाविरुद्ध पुतण्या संघर्ष दिसणार आहे. अजित पवार यांच्याबरोबर गेलेले सहकार मंत्री दिलीप (>Dilip Walse) वळसे पाटलांवर दोन दिवसांपूर्वी शरद पवारांवर जोरदार तोफ डागली होती. त्याला उत्तर देण्यासाठी अजित पवार हे वळसे यांच्या मतदारसंघात येत आहेत.


पंतप्रधान मोदींकडून अंतराळवीरांच्या नावाची घोषणा; 2025 ला मोहिमेवर जाणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 4 मार्च रोजी मंचर येथे सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहे. आंबेगाव तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे-पाटील हे सभेची तयारी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांची वळसे यांच्या मतदारसंघात सभा झाली होती. या सभेत विधानसभा, मंत्री, विधानसभा अध्यक्षपद व साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले. पण त्यांनी पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, असे दुःख शरद पवारांनी बोलून दाखविले. त्याच बरोबर त्यांना धडा शिकविण्याची वेळ आल्याचा इशाराही पवार यांनी दिला आहे.

कारखान्यावर षडयंत्र रचले का ? राजेश टोपेंकडून सरकारला प्रत्युत्तर देत थेट आव्हानही

त्यानंतर दोन दिवसात एका कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर माझेही तेवढेच प्रेम आहे. पण काही राजकीय प्रश्न असतात, असे वळसे म्हणाले. तर वळसे यांच्यासमोर काही जणांनी शरद पवार जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे आता अजित पवार हे मंचरच्या सभेत शरद पवार यांना कसे उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.

बारामतीबरोबर शिरुर लोकसभा मतदारसंघाकडे अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. या मतदारसंघातून खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करायचा विडाच अजित पवार यांनी घेतला आहे. तसे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगतिले आहे. आंबेगाव मतदारसंघही शिरुर लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळेही या सभेला महत्त्व आले आहे.

follow us