पंतप्रधान मोदींकडून अंतराळवीरांच्या नावाची घोषणा; 2025 ला मोहिमेवर जाणार
Gaganyaan Mission : गगणयान मोहिमेंतर्गत (Gaganyaan Mission) अंतराळात जाणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे पंतप्रधान मोदींनी घोषणा केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळच्या तिरुअनंतपुरम इथल्या इस्त्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट दिली. यावेळी मोदींनी ट्रायसोनिक विंड टनेल प्रकल्पाचे उद्घाटन केलं. हे अंतराळवीर गगणयान मोहिमेद्वारे अंतराळात जाणार आहेत.
‘जरांगेंची SIT चौकशी ‘चिवट’पणे करा’; ‘चिवट’ शब्दावर जोर देत उद्धव ठाकरेंची मागणी…
पंतप्रधान मोदींनी इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांच्यासोबत अंतराळातील मोहिमेचा आढावा घेतला. यासोबतच पंतप्रधानांनी अंतराळ उड्डाण मोहिमेतील अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली. प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप, अजीत कृष्णन, शुभांशु शुक्ला अशी अंतराळवीरांची नावे मोदींनी घोषित केली आहेत.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले, आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार आहोत. काही काळापूर्वी, देशाला आपल्या प्रवाशांची पहिल्यांदा ओळख झाली. ही केवळ 4 नावे आणि 4 मानव नाहीत, तर त्या 140 कोटी भारतीयांची आकांक्षा असून चार शक्ती आपल्याला अंतराळात घेऊन जाऊ शकतात असं मोदींनी स्पष्ट केलं आहे. ही मोहीम 2025 मध्ये प्रक्षेपित केली जाईल आणि या अंतर्गत 400 किलोमीटरच्या कमी कक्षेत दोन ते तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवले जाणार आहे.