महात्मा फुले स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही; अजित पवारांची ग्वाही

Ajit Pawar News : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. दरम्यान, पुण्यातील भिडेवाडा येथील महात्मा फुलेंच्या राष्ट्रीय स्मारकाच्या विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी अजित पवार यांनी […]

Ajit Pawar

Ajit Pawar

Ajit Pawar News : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. दरम्यान, पुण्यातील भिडेवाडा येथील महात्मा फुलेंच्या राष्ट्रीय स्मारकाच्या विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी अजित पवार यांनी ग्वाही दिली आहे.

Video : Shakib Al Hasan राजकीय पिचवरही हिट ! पण चाहत्याला मारहाण केल्याने प्रचंड ट्रोल !

अजित पवार म्हणाले, देशात स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून शैक्षणिक, सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात क्रांतीकारी कार्य करणाऱ्या फुले दाम्पत्यांसारख्या महामानवांचे स्मारक त्यांच्या कार्याला न्याय देणारे असले पाहिजे. त्यासाठी हेरिटेज दर्जा आणि आधुनिक वास्तूकलेचा सुरेख मिलाप साधून हे प्रेरणादायी स्मारक तयार करण्यात यावं, तसेच स्मारकाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

‘त्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा’; फडणवीसांनी केलेल्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे देशात स्त्रीशिक्षणाची सुरुवात झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आत्मविश्वासाने वावरताना दिसतात. त्याचे श्रेय सर्वस्वी क्रांतीज्योती सावित्रीबाईंना जाते. त्यामुळे सावित्रीबाईंचे कार्य, स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, केलेला त्याग याची माहिती शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Manoj Jarange : ‘कारवाई करूनच दाखवा मग मराठे सुद्धा’… जरांगेंचं अजितदादांना सडेतोड उत्तर

या कार्यातून युवा पिढीला मार्गदर्शन, प्रेरणा मिळाली पाहिजे. यासाठी प्रस्तावित स्मारकांमध्ये फुले दांपत्याच्या जीवनकार्याबद्दलची माहिती देणारे थिएटर, युपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण केंद्रासारख्या सुविधा असल्या पाहिजेत. नवे स्मारक पुण्याच्या हेरीटेज वास्तुसौंदर्यात भर घालणारे असले पाहिजे, त्यासाठी आराखड्यावर अधिक काम करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, आदी उपस्थित होते.

Exit mobile version