Ambadas Danve : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात पोर्श कारने (Porsche Car Accident) बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोघांचा जीव घेतला. याप्रकरणी सोमवारी (27 मे) रोजी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप असलेले डॉ. अजय तावरे (Ajay Tavare) आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली. दरम्यान, यावर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) भाष्य केलं.
T20 World Cup : टी 20 विश्वचषकात युवा खेळाडूंचा भरणा; ‘या’ मॅचविनर खेळाडूंची एन्ट्री
तावरेंना कुणाचा आशिर्वाद ?
अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना त्यांनी पुणे पोर्श कार अपघातप्रकरणावरून चांगलाच संताप व्यक्त केला. ते म्हणाले, वैद्यकीय खात्याचा कारभार गिरीश महाजन यांच्याकडे असताना वैद्यकीय शिक्षण विभागातून 16 लोकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यातील फक्त अजय तावरे यांची बदली झाली नाही. फक्त अजय तावरे यांना संरक्षण दिले जातेय असं का?, आजपर्यंत तावरेंना कुणाचा आशिर्वाद होता, असा संतप्त सवाल दानवेंनी केला.
विशाल अग्रवालकडे कुठल्या मंत्र्यांचे पैसे अडकलेत, त्याची चौकशी करा; आंबेडकरांची मागणी
ससून रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करणाऱ्या समितीच्या प्रमुख डॉ.पल्लवी सापळे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे चौकशीची अहवाल सोपवला. याविषयी विचारले असता दानवे म्हणाले की, पल्लवी सापळे यांच्याकडे चौकशी दिली होती. मुळात ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणे म्हणजे सरकारच्या हेतूवर शंका आणणारे आहे. स्वत:च्या मर्जीतील अधिकारी नेमून स्वतःला पाहिजे तसे सरकार करत आहे. ही चौकशी निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत व्हायला हवी होती, असं दानवे म्हणाले. रक्तांच्या नमुन्यात फेरफारे करणारे हे पांढरा कोट घातलेले अतिरेकी आहेत कि काय? असं वाटत आहे.
अमितेश कुमार चांगले अधिकारी असतील तर त्यांनी या प्रकरणाच्या खोलवर जाण्याची आवश्यकता आहे, असंही दानवे म्हणाले.
यावेळी बोलतांना दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीका केली. ते म्हणाले की, मागील दोन आठवड्यात 37 आत्महत्या झाल्या आहेत. त्यांनी शेतकरी आत्महत्येवर काहीच भाष्य केलं नाही. मुख्यमंत्री फक्त टँकर बघायला मराठवाड्यात आले होते का? पाणी टंचाई आहे, मात्र सरकारने टंचाई आराखडा केलेला नाही, असं दानवे म्हणाले.
ते म्हणाले, बी बियाणे आराखड्यामध्ये बी बियाणे किमान दीड पट असावे लागते. खाजगी कंपनी शेतकऱ्यांना त्रास देऊ शकतात. बी बियाणेंची उपलब्धता महाबीज कडून झाली पाहिजे होती. महाबीजकडून फक्त 3.96% उपलब्धता केली आहे. सरकार यावर सुद्धा लक्ष देत नाहीये, अशी टीका दानवेंनी केली.