‘या’ दर्जाचे दूध राज्यातील शेतकरी घालू शकतो ? वळसे पाटलांनी एफडीएच्या एका नियमावर बोट ठेवले

Dilip Walse Patil-राज्यात एफडीएचे दोन विभाग कार्यरत आहे. केंद्राचे एफडीए आणि राज्याचे एफडीए आहे.

Dilip Walse Patil

Dilip Walse Patil

पुणे: जिल्ह्यातील मंचर (Manchar) दूध भेसळप्रकरण राज्यात गाजत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दूध भेसळीप्रकरणी अडचणीत आहेत. या प्रकरणी येथील आमदार व ज्येष्ठ दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मंचर येथे जनसंवाद मेळावा आयोजित करून आपल्यावरील विरोधकांनी केलेले आरोप फेटाळले आहे. तसेच राज्यात दूध संकलन का घटत आहेत, याचे कारण वळसे यांनी मेळाव्यात सांगितले आहे.

बीडच्या आंबेजोगाईतून धक्कादायक बातमी समोर; मित्रासोबत दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा जाग्यावरच…

दूध संकलनात दोन एफडीए कसे कार्यरत आहे, याबाबत वळसे म्हणाले, राज्यात एफडीएचे दोन विभाग कार्यरत आहे. केंद्राचे एफडीए आणि राज्याचे एफडीए आहे. दोन्ही विभाग दूध संकलन, दूध प्रोसेसिंगसाठी परवानगी देते. ते केंद्राचा एफडीए काय सांगतो. शेतकऱ्यांनी आणलेले जसेचे तसे दूध तुम्ही स्वीकारले पाहिजे. पण बाहेरच्या मार्केटमध्ये जसेतसे दूध पाठवता येणार नाही. दर्जेदार दूध देण्याची जबाबदारी प्रोसेस करणाऱ्या कंपनीची आहे. भेसळयुक्त, कमी प्रतीचे दूध नागरिकांना देऊ नये, असे केंद्राच्या एफडीए विभागाचा नियम आहे.

पिक्चर संपल्यानंतर नवीन पिक्चर सुरू करणं एवढं सोपं नसतं; खडसे तावडे भेटीवर गुलाबरावांची फटकेबाजी

आता महाराष्ट्राच्या एफडीए विभागाने नवीन नियम आणलाय, कुठल्याही डेअऱ्यांनी म्हणजेच दूध संकलन करणाऱ्यांनी फॅट 3.5 व एसएनएफ 8.3 याच्या खाली दूध खरेदी करायचे नाही. राज्यातील शेतकरी या दर्जाचे दूध घालू शकतो का ? आदिवासी भागातील शेतकरी या दर्जाचे दूध घालू शकतो का ? मग कंपन्यांवर जबाबदारी आहे या दूधाची विल्हेवाट लावायचे नाही. ते दूध परत करायचे आहे. दूधाचे संकलन कमी झाले तर दूधाचे भाव वाढतील. दूधाचे संकलन करण्यासाठी अटी केंद्र व राज्य सरकारने अटी घातल्या आहेत, असा धोकाही वळसे यांनी दर्शविला आहे.

दूध भेसळीप्रकरणात जवळचा कार्यकर्ता असला तरी मी पाठीशी खालू शकत नाही. पडद्याआडचा सूत्रधार मी नाही हे लक्षात ठेवा. येथे सूत्रधारच नाही, येथे इतकी मजल पुढे गेली की या तालुक्याचा आका कोण ? अरे उदाहरण सांगायला गेलो तर या तालुक्याला कळेल खरा आका कुठे आहे ? असा सवालही दिलीप वळसे पाटलांनी मेळाव्यात केला आहे.

Exit mobile version