Central cabinet Oath Ceremony : देशात एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन होत असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज ( 9 जून ) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ (Oath Ceremony) घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकूण 52 ते 55 मंत्री शपथ घेऊ शकतात. त्यामध्ये राज्यातील 5 जणांना फोन आलेले आहेत. त्यामध्ये पुण्याच्या मुरलीधर मोहोळांसह (Muralidhar Mohol ) रक्षा खडसे, प्रतापराव जाधवांची देखील केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे. मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवासही खास राहिला आहे. पुणे शहराचे महापौर म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून त्यांनी खासदारकी मिळवली. आता थेट मंत्रिपदासासाठी त्यांनी थेट दिल्लीतून फोन आल्याची माहिती आहे.
बारामती जिंकताच सुप्रिया सुळेंचं पुणे शहरात जंगी स्वागत; अजितदादांबद्दल म्हणाल्या, मी…
मोहोळ यांनी भाजपमधून राजकारणात प्रवेश केला. पक्षात त्यांनी विविध पदं सांभाळली. मोहोळ पुणे महापालिकेत चार वेळा नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच महापौर राहिले आहेत. मोहोळ यांचं कुटुंब कुस्ती क्षेत्राशी निगडीत आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी शिक्षणाबरोबरच कु्स्तीचेही धडे गिरवले. त्यांचे आजोबा, वडील, काका आणि मोठे बंधू पैलवान आहेत. पुण्यात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुस्तीची कला शिकण्यासाठी त्यांनी कोल्हापूर गाठलं. कोल्हापुरात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोहोळ पुण्यात आले. यानंतर भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन त्यांनी 1993 च्या काळात राजकारणात प्रवेश केला. याच काळात मोहोळ माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या संपर्कात आले. यानंतर त्यांचा राजकारणात दबदबा निर्माण होण्यास सुरुवात झाली.
पार्टी संघटनेने त्यांना वॉर्ड महासचिव, वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चा महाराष्ट्र सचिव, शहर भाजप उपाध्यक्ष, शिक्षा बोर्ड सदस्य अशा अनेक जबाबदाऱ्या दिल्या. सन 2002, 2007, 2012 आणि 2017 या काळात मोहोळ सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर पक्षाने त्यांना महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी दिली. 2019 ते 2022 या चार वर्षांच्या काळात मोहोळ पुणे महापालिकेचे महापौर होते.
Pune Loksabha : पुण्याची जागा भाजपचीच! बापटांनंतर मोहोळांच्या हाती कमान, धंगेकरांचा पराभव
त्यांनी स्मार्ट सिटी आणि पीएमपीचे निदेशक, पीएमआरडीएचे सद्स्याच्या रुपातही आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. यानंतर भाजपने त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर होते. तसेच वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना तिकीट दिले होते. या तिरंगी लढतीत मोहोळांनी बाजी मारली.